Riteish Deshmukh and genelia dsouza spot on airport, genelia fans worried due to her injured hand | एअरपोर्टला दिसले रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा, जेनलियाला पाहून चाहत्यांना आले टेन्शन

एअरपोर्टला दिसले रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा, जेनलियाला पाहून चाहत्यांना आले टेन्शन

ठळक मुद्देतिच्या हाताला प्लास्टर दिसत असल्याने तिच्या चाहत्यांना चांगलेच टेन्शन आले आहे. पण तिला काय झाले आहे हे अद्याप तरी काहीही कळलेले नाहीये.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्यांची एक झलक पाहाण्यासाठी त्यांचे चाहते आतुर असतात. त्यांना दोघांना नुकतेच मुंबई एअरपोर्टवर पाहाण्यात आले. पण यावेळी जेनेलियाला पाहून तिच्या चाहत्यांना चांगलेच टेन्शन आले.

जेनेलियाच्या हाताला दुखापत झाली असल्याचे एअरपोर्टवरील व्हायरल झालेल्या फोटोत आपल्याला पाहायला मिळत आहे. तिच्या हाताला प्लास्टर दिसत असल्याने तिच्या चाहत्यांना चांगलेच टेन्शन आले आहे. पण तिला काय झाले आहे हे अद्याप तरी काहीही कळलेले नाहीये. 

चार दिवसांपूर्वी रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओत   रितेश देशमुख, पत्नी जेनेलिया व मित्रांसोबत ‘टोटल धमाल’च्या ‘पैसा ये पैसा’ या गाण्यावर थिरकताना दिसले होते. स्वीमिंग पूलच्या काठावर डान्स करता करता अचानक रितेशच्या एका मैत्रिणीचा पाय घसरला होता आणि ती पूलमध्ये पडली होती. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात रितेशही पूलमध्ये पडला होता. हे पाहून सगळे खळखळून हसले होते. हा व्हिडिओ काढला, त्यावेळी जेनेलियाचा हात व्यवस्थित होता. त्यामुळे तिला गेल्या तीन-चार दिवसांत काही दुखापत झाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Riteish Deshmukh and genelia dsouza spot on airport, genelia fans worried due to her injured hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.