ठळक मुद्देविनोद मेहरा आणि तुझं लग्न झालं असं म्हटले जाते हे खरे आहे का त्यावर क्षणाचाही विलंब न लावता रेखा यांनी सांगितले होते की, विनोद हे माझ्यासाठी खूप खास होते. माझ्या आयुष्यात त्यांची खास जागा होती.

रेनदे विथ सिमी गरवाल हा सिमी गरेवाल यांचा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या आयुष्याची गुपिते सांगितली होती. या कार्यक्रमाच्या एका भागात प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी उपस्थिती लावली होती. रेखा यांना त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी प्रसिद्धी माध्यमांमध्ये सांगायला कधीच आवडत नाही. पण या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गप्पा मारल्या होत्या. रेखा आणि विनोद मेहरा यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा झाली होती. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी लपून लग्न केले होते असे देखील म्हटले जात होते. रेखा यांनी या चर्चेविषयी मौन राखणेच पसंत केले होते. पण रेनदे विथ सिमी गरवाल या कार्यक्रमात त्यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत असलेल्या नात्याविषयी त्यांनी खुलासा केला होता. 

रेनदे विथ सिमी गरेवाल या कार्यक्रमात सिमी यांनी रेखा यांना विचारले होते की, विनोद मेहरा आणि तुझं लग्न झालं असं म्हटले जाते हे खरे आहे का त्यावर क्षणाचाही विलंब न लावता रेखा यांनी सांगितले होते की, विनोद हे माझ्यासाठी खूप खास होते. माझ्या आयुष्यात त्यांची खास जागा होती. पण मी आणि विनोद यांनी कधी लग्न केले नाही. रेखा यांचे हे उत्तर ऐकल्यानंतर सिमी यांनी पुन्हा एकदा विचारले होते. खरंच तुम्ही लग्न केल नव्हते का... त्यावर कधीच नाही असे उत्तर रेखा यांनी दिले होते. 

रेखा यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केले होते असा उल्लेख एका पुस्तकात देखील करण्यात आला होता. यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर रेखाः द अन्टोल्ड स्टोरी हे पुस्तक लिहिले होते. रेखा यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केले ही गोष्ट त्यांनी कधीच मीडियात मान्य केली नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rekha was rumoured to be in a relationship with her married costar vinod mehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.