ठळक मुद्देरेखा आणि संजय जमीन आस्मान या चित्रपटात काम करत होते. त्यावेळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी लग्न केले असे देखील काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते.

रेखा आणि संजय दत्त यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. रेखा आणि संजय दत्त एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी लपून छपून लग्न केले होते अशी चर्चा त्याकाळात मीडियात गाजली होती.

संजय दत्तने तीन लग्नं केली आहेत. पण त्याने तीन नव्हे चार लग्न केली असून पहिले लग्न रेखा यांच्यासोबत केले अशी चर्चा काही वर्षांपूर्वी मीडियात झाली होती. रेखा: द अनटोल्ड स्टोरी या बायोग्राफीमध्ये संजय आणि रेखा यांच्याविषयी लिहिले गेेले असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी रंगली होती. पण या पुस्तकाचे लेखक यासीर उस्मान यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, अशा कोणत्याही गोष्टीचा या पुस्तकात उल्लेख करण्यात आलेला नाहीये. लोकांनी पुस्तक व्यवस्थित वाचलेले नाहीये असे मला वाटते. 

त्यांनी पुढे सांगितले होेते की, रेखा आणि संजय जमीन आस्मान या चित्रपटात काम करत होते. त्यावेळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी लग्न केले असे देखील काही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. त्यामुळे संजयने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टी चुकीच्या असल्याचे म्हटले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rekha married Sanjay Dutt in a secret ceremony?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.