पटौडी कुटुंबाची सून होण्यापूर्वी करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या अफेयरची सगळीकडे खूप चर्चा होती. त्या दोघांनी २००४ साली एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूरने २०१२ साली सैफ अली खानसोबत लग्न केले.


मीडिया रिपोर्ट्सनुसार शाहिद कपूर आणि करीना कपूरचे ब्रेकअप अभिनेत्री अमृता रावमुळे झाल्याचे बोलले जाते. असे सांगितले जाते की अमृता आणि शाहिदचा चित्रपट विवाहच्या दरम्यान त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर करीनासोबत असलेल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. विवाह चित्रपट २००६ साली रिलीज झाला होता. त्यावेळी करीना आणि शाहिदच्या नात्याची खूप चर्चा होत होती. कित्येक लोकांनी त्यांचे ब्रेकअप होण्यामागे करिश्मा कपूरला जबाबदार ठरविले. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की करिश्मा कपूरला शाहिद आवडत नव्हता.


२००४ साली सुरू झालेल्या शाहिद आणि करीनाच्या लव्हस्टोरीची बीटाउनशिवाय मीडियात खूप चर्चा झाली होती. बऱ्याचदा दोघे एकत्र स्पॉट झाले होते. इतकेच नाही तर दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले होते. मात्र शाहिद आणि करिनाच्या नात्यात कटूता जब वी मेट दरम्यान आली होती.

२००६ साली जेव्हा जब वी मेट चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली होती तेव्हा त्यांच्यात चांगले रिलेशन होते. मात्र चित्रपटाचे शूटिंग संपता संपता दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. या चित्रपटाशी निगडीत लोकांनी सांगितले होते की सेटवर दोघांमध्ये फार कमी बातचीत व्हायची. चित्रपटाच्या शेवटच्या सीनच्या शूटवेळी दोघे वेगवेगळ्या गाडीतून सेटवर आले होते. 


एका मुलाखतीत ब्रेकअपबद्दल सांगताना करीनाने जब वी मेट चित्रपटातील गीतचा उल्लेख करत सांगितले की, माझे खरे आयुष्यदेखील गीतसारखे होते. मला त्यावेळी खासगी आणि प्रोफेशनली सर्व हँडल करणं कठीण जात होते. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर गीतचे जीवन सेकेंड हाफनंतर बदलून जाते तसेच माझ्या जीवनात चित्रपट बनताना झाले होते.या चित्रपटानंतरच करीनाने टशन चित्रपटात काम केले होते.

या चित्रपटानंतर करीना आणि सैफने एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ साली ते दोघे विवाहबद्ध झाले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: For this reason, Kareena Kapoor had a breakup with Shahid Kapoor, the daughter-in-law of Anjali Pataudi family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.