ठळक मुद्देअभिनेता रणवीर सिंगला अनेक वेळा त्याच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात. पण त्याने नुकताच केलेला गेटअप त्याच्या चाहत्यांना आवडला आहे.

कोरोनाचा देशभर प्रार्दुभाव वाढला आहे. त्यामुळे लोक सार्वजनिक ठिकाणी जाताना आवर्जून मास्क घालताना दिसत आहे. एका अभिनेत्याने तर कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्याचा संपूर्ण चेहराच झाकला होता. त्याचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

अभिनेता रणवीर सिंगला अनेक वेळा त्याच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात. पण त्याने नुकताच केलेला गेटअप त्याच्या चाहत्यांना आवडला आहे. रणवीरला एका डबिंग स्टुडिओच्या बाहेर पाहाण्यात आले. त्यावेळी त्याने मास्क घालण्यासोबतच मंकी कॅप घातली होती आणि डोळ्याला गॉगल लावला होता. त्यामुळे त्याला ओळखणे कठीण जात होतेे. 

रणवीरने कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी केेलेली खबरदारी त्याच्या चाहत्यांना आवडत आहे. रणवीरच्या या गेटअपची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. 

रणवीर सिंग बॉलिवूडच्या सर्वाधिक गुणी अभिनेत्यांपैकी एक आहे, यात काहीही शंका नाही. प्रत्येक सिनेमात त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. बँड बाजा बरात या चित्रपटापासून त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बाजीराव मस्तानी, पद्मावत, राम लीला, दिल धडकने दो यांसारख्या अनेक चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर रणवीरचा ‘83’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सध्या तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या सिनेमात बिझी आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ranveer singh hide his full face, spotted outside dubbing studio in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.