ठळक मुद्देशाहिन ही आलियाची मोठी बहीण असून शाहिनचा जन्म 1988 साली झाला. बॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहणं शाहिनला पसंत आहे.

रणबीर कपूर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या एका फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कारण रणबीरने पोस्ट केलेल्या या फोटोत रणबीरसोबत आलिया नव्हे तर एक दुसरीच मुलगी दिसत आहे. एवढेच नव्हे तर या मुलीला रणबीर चक्क गालावर किस करताना दिसत आहे.

रणबीरसोबत असलेली ही मुलगी कोण आहे असा प्रश्न पडला असले ना... ही मुलगी दुसरी कोणी नसून आलिया भटची बहीण शाहिन असून या फोटोवर रणबीरच्या चाहत्यांनी अनेक कमेंट लिहिल्या आहेत. साली आधी घरवाली म्हणत रणबीरची टर उडवताना देखील ते दिसत आहे. शाहिन ही आलियाची मोठी बहीण असून शाहिनचा जन्म 1988 साली झाला. बॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर राहणं शाहिनला पसंत आहे. त्यामुळेच शाहिनबाबत कुणालाही फारसं काहीही माहित नाही. वयाच्या तेराव्या वर्षी शाहिन डिप्रेशनमध्ये गेली. एका मुलाखतीमध्ये आलियाने याबाबत कबुली दिली होती.

रणबीर, आलिया शिवाय नीतू कपूर, रणबीरची बहीण रिद्धिमा, मित्र अयान मुखर्जी इतकेच नाही तर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग असे सगळेच सध्या राजस्थानातील रणथंबोर येथे पोहोचले आहेत. त्यामुळे आलिया-रणबीर रणथंबोरला गुपचूप साखरपुडा करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण यावर रणबीरचे काका रणधीर कपूर यांनी खुलासा केला आहे.

एबीपी न्यूजशी बोलताना रणधीर कपूर यांनी आलिया-रणबीरच्या साखरपुड्याची बातमी निव्वळ अफवा असल्याचे सांगितले होते. ‘असे काहीही नाही. या बातमीत काहीही तथ्य नाही. रणबीर आणि आलियाचा साखरपुडा होणार असता तर मी आणि आमच्या कुटुंबातील अन्य लोक त्यांच्यासोबत असते ना? रणबीर, आलिया आणि नीतू तिथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गेले आहेत. याशिवाय काहीही नाही. ’

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ranbir Kapoor Kisses Alia Bhatt’s Sister Shaheen Bhatt at The Family Christmas Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.