ठळक मुद्देरणबीर कपूरने आजवर अजब प्रेम की गजब कहानी, रॉकेट सिंग, बर्फी, संजू यांसारखे अनेक हिट चित्रपट दिलेत.

बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूरचा आज वाढदिवस. चित्रपटांपेक्षा रणबीर त्याच्या लव्हलाईफमुळेच अधिक चर्चेत राहिला. अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबतचे रणबीरचे अफेअर प्रचंड गाजले. अगदी रणबीर व दीपिका लग्न करणार, अशीही चर्चा रंगली. पण एका वळणावर हे नाते संपले़ का? तर त्यासाठी तुम्हाला पुढची स्टोरी वाचावी लागेल.

अशी झाली होती पहिली भेट
रणबीर कपूर व दीपिका पादुकोणची पहिली भेट मेकअप आर्टिस्टमुळे झाली होती. होय, त्यावेळी दीपिका ‘ओम शांती ओम’ या सिनेमाचे शूटींग करत होती तर रणबीर ‘सांवरिया’च्या शूटींगमध्ये बिझी होता. दोघांचा मेकअप आर्टिस्ट एकच होता. याच माध्यमातून दोघांची पहिली भेट झाली होती. पुढे मैत्री झाली आणि नंतर दोघे प्रेमात पडले. रणबीर व दीपिकाची जोडी चाहत्यांनाही आवडत होती. काहीच महिन्यांत बॉलिवूडच्या चर्चित कपल्समध्ये त्यांचे नाव घेतले जाऊ लागले होते.

दीपिका रणबीरच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. अगदी रणबीरच्या कुटुंबानेही दीपिकाला स्वीकारले होते. रणबीरची मॉम नीतून कपूरही दीपिकावर फिदा होत्या आणि तिला आपल्या घरची सून बनण्यास उतावीळ होत्या. पण अचानक रणबीर व दीपिकाचे ब्रेकपक झाले. कारण काय तर प्रेमात विश्वासघात.

होय, एकीकडे रणबीर दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता.  दुसरीकडे त्याचे नाव अन्य मुलींसोबतही जोडले जात होते. रणबीर तुला धोका देतोय, असे अनेकांनी दीपिकाला सांगितले होते. तिला याबद्दल सावध केले होते. पण दीपिका हे मानायला तयार नव्हती. एक दिवस मात्र तिने स्वत:च रणबीरला रंगेहात पकडले. यानंतर मात्र दीपिकाने रणबीरसोबतचे नाते कायमचे तोडण्याचा निर्णय घेतला. अशा रिलेशनशिपपेक्षा सिंगल राहिलेले बरे, असा विचार तिने केला. एका मुलाखतीत खुद्द दीपिकाने ही गोष्ट सांगितली होती.
या ब्रेकअपनंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती. पण हळूहळू ती यातून सावरली. विशेष म्हणजे, इतके घडूनही दीपिका व रणबीर यांच्यात आजही चांगली मैत्री आहे.

 
घराच्या पाय-यांवर रात्रभर बसून राहायचा रणबीर...

रणबीर कपूरने आजवर अजब प्रेम की गजब कहानी, रॉकेट सिंग, बर्फी, संजू यांसारखे अनेक हिट चित्रपट दिलेत. रणबीर लहान असताना त्याचे वडील ऋषी कपूर आणि आई नीतू सिंग यांच्यात सतत वाद व्हायचे असे रणबीरने एका मुलाखतीत सांगितले होते. रणबीरने सांगितले होते की, त्यांची भांडणे कधी कधी तर इतकी विकोप्याला पोहोचायची की मी घराच्या पाय-यांवर रात्रभर बसून राहायचो. त्यांची भांडणं कधी संपणार याची वाट पाहायचो. कधी कधी तर सकाळी पाच-सहापर्यंत असेच सुरू असायचे. अनेक वर्षांपर्यंत माझ्या पालकांचे पटत नव्हते. त्यामुळे या सगळ्यात मी काय करू हेच मला कळायचे नाही. या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होऊ नये यासाठी माझी आई प्रयत्न करायची. पण तरीही त्यांच्या नात्यातील कटुता पाहातच मी लहानाचा मोठा झालो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ranbir kapoor birthday special deepika padukone caught ranbir many times red handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.