Rajkummar rao stood outside mannat for hours to see shahrukh khan | कधी शाहरुख खानला भेटण्यासाठी 'मन्नत'च्या बाहेर तासन तास उभा राहायचा राजकुमार राव

कधी शाहरुख खानला भेटण्यासाठी 'मन्नत'च्या बाहेर तासन तास उभा राहायचा राजकुमार राव

राजकुमार रावची गणना आज बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमारच्या अभिनय आणि स्टायलचे लाखो दिवाने आहेत. अलीकडे दिलेल्या एका मुलाखती दरम्यान राजकुमारने सांगितले की तो अभिनेता शाहरुख खानचा फॅन आहे. 


राजकुमारने सांगितले की, मी शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे. मी पहिल्यांदा अकरावीत असताना मुंबईत आलो होतो तेव्हा मी 'मन्नत' (शाहरुख खानच्या घराबाहेर) च्या बाहेर अनेक तास उभा होतो. शाहरुखची एक तरी झलक मला पाहायला मिळावी अशी माझी इच्छा होती. अनेक तास उभे राहिल्यानंतर देखील मला शाहरुखला पाहायला न मिळाल्याने मला खूप वाईट वाटले होते. मी शाहरुख खानला सगळ्यात पहिल्यांदा चित्रीकरणाच्या निमित्ताने मेहबुब स्टुडिओत भेटलो. मी त्याला भेटलो त्यावेळी त्याला माझ्याविषयी सगळे काही माहीत होते. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता. पण याच सगळ्या गोष्टी त्याला खास बनवतात असे मला वाटते. मी आज त्याला कधीही फोन, मेसेज करू शकतो. तो देखील मला अनेकवेळा फोन करतो. पण आजही मी त्याचा खूप मोठा फॅन असून त्याला भेटल्यावर, त्याच्याशी फोनवर बोलताना मला तितकाच आनंद होतो. 


 राजकुमार राव आगामी चित्रपट छलांगसोबत सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी सज्ज झाला आहे. "छलांग" मध्ये राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांची जोडी पाहायला मिळणार आहे. ही एक उत्तर भारतातील निम-सरकारी शाळेच्या पीटी शिक्षकाची प्रेरणादायी कहाणी आहे.याच महिन्यात तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rajkummar rao stood outside mannat for hours to see shahrukh khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.