बहुप्रतीक्षित वेब सीरीज 'अभय 2’ #TheRoadToJustice  प्रदर्शित झाली आहे. ही बेबसिरीज क्राइम थ्रिलरवर आधारित असून  ज्यात खलनायकांची भली मोठी टोळीचा समावेस असतो.यात  कुणाल केमू मुख्य भूमिकेत झळकणार असून आशा नेगी आणि निधि सिंह यांच्याही भूमिका आहेत. बिदिता बैग, राघव जुयाल, इंद्रनील सेनगुप्ता आणि असीमा वर्धन हे कलाकार पहिल्यांदा खलनायकाच्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यापूर्वी तुम्ही यांचा असा खलनायकी अवतार कधीच पाहिला नसेल.

नुकताच राघव जुयालचा लुक समोर आला आहे. त्याच्या लुकला पाहून हा राघवच आहे का असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा पासून राघवचा हा लुक समोर आला आहे तेव्हा पासून चाहत्यांमध्ये केवळ त्याच्याच भूमिकेविषयी चर्चा सुरू आहेत. एरव्ही सुटबुटमध्ये अँकरिंक करताना दिसणारा राघव यात मात्र अतिशय धडकी भरवणा-या रूपात पाहायला मिळतोय. याविषयी राघवने सांगितले की, या भूमिकेमुळे मला खूप काही शिकायला मिळाले. भूमिका साकारतानाचा अनुभव शब्दात मांडणे कठिणच आहे. 

हा दुसरा सिझन असल्यामुळे अगदी काटेकोरपणे सगळ्या गोष्टींवर लक्ष देण्यात आले आहे. पहिल्या सिझनप्रमाणे दुस-या सिझनचीही रसिकांमध्ये अधिक उत्सुकता होती. आता 'अभय २' पाहण्याची रसिकांची प्रतिक्षाही संपली आहे. हा सिझनही रसिकांचे भरघोस मनोरंजन करेल अशी आशा असल्याचे राघवने म्हटले आहे. 

‘अभय’चा पहिला सिझनमध्ये अधिकारी अभय प्रताप सिंह भूमिकेने चाहत्यांवर छाप सोडली होती. आता दुस-या सिझनमध्ये कुणाल केमू ​​अभय प्रताप सिंहच्या भूमिकेत पुन्हा एकदा झळकणार पुन्हा एकदा रसिकांचे भरघोस मनोरंजन होणार हे मात्र नक्की.


या वेबसिरीजमध्ये आशा नेगीने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी तिने सांंगितले की, मी कधी पत्रकाराची भूमिका केली नव्हती. यासाठी उत्तम भाषाशैली आणि साध्या सोप्या भाषेत समजवण्याची क्षमता आवश्यक आहे.  माझ्या पात्रात बर्‍याच विविध छटा होत्या. ही भूमिका साकारणे  माझ्यासाठी एक आव्हानात्मक काम होते. मला जगभरातून मेसेजेस येत आहेत. 'अभय २' मधील काम सगळ्यांच्या पसंतीस पात्र ठरावे हीच आशा असल्याचे तिने म्हटले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Raghav Juyal is Making His Web Series Debut with Abhay 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.