ठळक मुद्देप्रियंका क्वाँटिको या मालिकेमुळे चर्चेत आली होती. त्यावेळेचा हा किस्सा आहे. एका फ्लाइट अटेंडंटनी रेडइट वेबसाइटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता

प्रियंका चोप्राने बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्ये देखील तिचे एक स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे किस्से फेमस असतात. तसाच प्रियंका चोप्राचा एक किस्सा चांगलाच प्रसिद्ध असून याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

प्रियंका क्वाँटिको या मालिकेमुळे चर्चेत आली होती. त्यावेळेचा हा किस्सा आहे. एका फ्लाइट अटेंडंटनी रेडइट वेबसाइटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. पण काहीच काळात हा व्हिडीओ सोशल मीडियावरून डीलिट करण्यात आला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर उपलब्ध नसला तरी हा किस्सा लोकांच्या आजही लक्षात आहे.

तिने या व्हिडिओत सांगितले होते की, प्रियांका प्रवास करत असताना मी त्या विमानात अटेंडेट होती. तिने मला बोलावलं आणि ब्लॅक मेरी हे कॉकटेल मागवलं. त्यासोबत हॉट सॉस पण तिने मागवले होते. प्रियांकाने तीन कॉकटेल प्यायले. ती हे प्यायल्यानंतर चांगलीच टल्ली झाली होती. त्यानंतर प्रियांका कुणाशीच काहीच बोलली नाही आणि झोपून गेली.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती 'अनफिनिश्ड' या तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर अमेरिकन टीव्ही प्रेझेंटर ओपेरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीनंतर ती सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. एका बोल्ड ड्रेसमुळे नुकतीच तिची चर्चा सोशल मीडियात रंगली होती. 

प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती 'द व्हाइट टाइगर' चित्रपटात दिसली होती. रमिन बहारानी दिग्दर्शित या चित्रपटात प्रियंकासोबत आदर्श गौरव आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka Chopra Allegedly Got Drunk In Flight Before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.