ही गोष्ट आहे त्या काळची जेव्हा सिनेमात नटी आणि नट्यांच्या रंग आणि रुपावर जास्त लक्ष दिले जात होते. जर कुणी सावळं असेल तर त्याला काम करण्याची संधी मिळत नसे. जुन्या सिनेमांमध्ये हिरोदेखील हिरॉईनसारखा मेकअप करत होते. ज्यावेळी बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगणने हिरो बनण्याचा विचार केला तेव्हा त्याची थट्टा करणारे बरेच लोक होते. अजय दिसायला साधारण होता. पण त्याने कधीच स्वतःला कमी लेखले नाही. याउलट त्याने हँडसम म्हणणाऱ्या हिरोंच्या तुलनेत जास्त यश मिळवले.


फाइट मास्टर वीरू देवगण यांचा मुलगा अजय देवगणने जेव्हा फूल और काँटे चित्रपट साइन केले तेव्हा लोकांनी निर्माते-दिग्दर्शकांना समजावले की कोणत्या हिरोला घेत आहात. चित्रपट पहिल्याच शोपासून फ्लॉप होऊन जाईल. अजयच्या चेहरा आणि रंगावरून खूप खिल्ली उडवली गेली.

पण अमिताभ बच्चन यांचे मत खूप वेगळे होते. अमिताभ बच्चन यांनी अजय देवगणच्या चेहऱ्यामागील अभिनेत्याला ओळखलं होतं. त्यांनी अजयला डार्क होर्स म्हटलं. याचा अर्थ असा की असा माणूस ज्याच्या विजयावर कुणाला विश्वास असो किंवा नसो पण तो नंबर वनच येणार आहे. बिग बींची ही भविष्यवाणी खरी ठरली आणि अजय देवगण बॉलिवूडमधील स्टार ठरला.


अजय देवगणचा पहिला चित्रपट फूल और काँटेसमोर यश चोप्राचा लम्हें रिलीज झाला होता. यात अनिल कपूर व श्रीदेवी हे कलाकार होते. या चित्रपटाचा खूप प्रचार व प्रसार केला होता. फूल और काँटेच्या निर्मात्यांना लोकांनी सल्ला दिला की ते लम्हें चित्रपटासोबत हा चित्रपट रिलीज करू नका. पण त्यांनी ऐकले नाही. अजय देवगणच्या चित्रपटासमोर लम्हें चित्रपट अयशस्वी ठरला आणि इतकंच नाही तर बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यानंतर अजयने कधीच मागे वळून पाहिले नाही.


अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो शेवटचा तान्हाजी चित्रपटात झळकला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लवकरत तो मैदान चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The prediction made by Amitabh Bachchan about Ajay Devgn came true, find out about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.