प्रभु देवाने फिजिओथेरपिस्टशी केलं गुपचूप लग्न, आता भावाने सांगितले यामागील खरं सत्य

By गीतांजली | Published: November 21, 2020 05:01 PM2020-11-21T17:01:59+5:302020-11-21T17:07:08+5:30

प्रभु देवा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे.

Prabhudheva married mumbai dr himani during lockdown brother confirms know here deatils | प्रभु देवाने फिजिओथेरपिस्टशी केलं गुपचूप लग्न, आता भावाने सांगितले यामागील खरं सत्य

प्रभु देवाने फिजिओथेरपिस्टशी केलं गुपचूप लग्न, आता भावाने सांगितले यामागील खरं सत्य

googlenewsNext

प्रभु देवा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. प्रभु देवाने लॉकडाऊनमध्ये लग्न केल्याची चर्चा रंगली आहे. प्रभु देवा वयाच्या आपल्याच भाचीशी लग्न करणार, अशा चर्चा अलीकडे होती मात्र ती अफवा ठरली. त्यानंतर अशी बातमी आली की त्याने एका फिजिओथेरपिस्टसोबत लग्न केले आहे.  प्रभु देवाच्या भावाने अखेर यावर खुलासा केला आहे. 

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, प्रभु देवाने मुंबईतल्या साकीनाका इथं राहणाऱ्या डॉक्टर हिमानीसोबत लग्न केलं आहे. , प्रभुदेवाच्या पाठीला मध्यंतरी दुखापत झाली होती. तेव्हा तो या फिजिओथेरपिस्टकडे उपचार घेत होता. यादरम्यान प्रभु देवावर उपचार डॉ. हिमानीने केले होते. तेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. लॉकडाऊन दरम्यान दोघेही मार्चमध्ये चेन्नईला गेले होते. तिथं 2 महिने  लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. यानंतर दोघांंनी मे महिन्यात लग्न केले. लॉकडाऊनमुळे लग्नात कोणीही सामील झाले नाही.

रिपोर्टनुसार, डॉ. हिमानी आतापर्यंत दोनदा मैसूरमध्ये सासरच्याना जाऊन भेटली आहे.  प्रभु देवाचा भाऊ राजू सुंदरम म्हणाला की, प्रभु देवाच्या लग्नामुळे तो खूप खूष हे. प्रभु देवाचे हे दुसरे लग्न आहे. भु देवाने 1995 साली रामलतासोबत पहिले लग्न केले होते. रामलतापासून त्याला 3 मुले झालीत. 2008 मध्ये प्रभुच्या मोठ्या मुलाचे कॅन्सरने निधन झाले होते. 2011 मध्ये प्रभुदेवाने पत्नी रामलतापासून घटस्फोट घेतला होता. अभिनेत्री नयनतारासाठी त्याने पत्नीला सोडले होते. प्रभुदेवा व नयनताराचे अफेअर चांगलेच गाजले होते.


 

Web Title: Prabhudheva married mumbai dr himani during lockdown brother confirms know here deatils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.