बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा दिग्दर्शक रिभू दास गुप्ता यांचा आगामी सिनेमा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’मध्ये एक अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे.  सिनेमाची कथा भारतीय एजंटांना वाचविण्याच्या मोहिमेवर असलेल्या परिणीतीच्या व्यक्तिरेखेभोवती फिरणार आहे.

चित्रपटाच्या टीमशी संबंधित एका सूत्रांनी सांगितले की, "सिनेमाची कथा भारत-पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात परिणिती एजंटची मुख्य भूमिका साकारणार आहे.  या सिनेमात रजित कपूर, केके मेनन, दिव्येंदु भट्टाचार्य आणि हार्डी संधूही दिसणार आहेत.

मार्चमध्ये सुरु होणार शूटिंग
मार्चपासून सुरु होणार सिनेमाचे शटिंग. रिलायन्स एंटरटेनमेंटद्वारे याची निर्मिती केली जाईल. सिनेमाचे निर्माते लोकेशन शोधत आहेत आणि शूटिंगसाठी परवानगी घेत आहेत. परिणीती चोप्रा आणि रिभू दासगुप्ताने आधी तीन सिनेमात एकत्र काम केले होते आणि आता दोघेही  2016मध्ये आलेल्या हॉलिवूडचा ब्लॉकबस्टर 'द गर्ल ऑन द ट्रेन' च्या हिंदी रिमेकची तयारी करत आहेत.


याशिवाय परिणीती भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये दिसणरा आहे. यात परिणीती सायना नेहवालची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका मुलाखतीत दरम्यान परिणीतीने सांगितले होते की, ही भूमिका खरंच खूप आव्हानात्मक आहे असं मी मानते. कारण चॅम्पियन बनणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही. त्यासाठी कठोर तपश्चर्या म्हणजेच कठोर मेहनत लागते. कारण स्पोर्ट्सपर्सन बालपणापासून त्यावर मेहनत घेतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Parineeti chopra to star in director ribhu dasgupta next film based on hollywood movie the girl on the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.