OMG ..! Shah Rukh Khan never pays the bill in a restaurant, find out the reason behind this | बाबो..! शाहरूख खान रेस्टॉरंटमध्ये कधीच भरत नाही बिल, जाणून घ्या यामागचं कारण

बाबो..! शाहरूख खान रेस्टॉरंटमध्ये कधीच भरत नाही बिल, जाणून घ्या यामागचं कारण

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसेच आहे. शाहरूख खान रेस्टॉरंटमध्ये जाताना कधीच पैसे घेऊन जात नाही आणि जेवणाचे बिल दुसऱ्यांना भरायला लावतो. हे खुद्द त्यानेच ट्विटरवर सांगितले आहे.


ट्विटरवर #AskSRK या हॅशटॅगने शाहरूख खानला त्याचे चाहते त्यांना हवे ते प्रश्न विचारतात आणि त्यांच्या या प्रश्नांचे उत्तरही तितक्यात खास अंदाजात किंग खान देताना दिसतो. नुकतेच ट्विटरवर एका युजरने #AskSRK टॅग करत विचारले की, जर तुम्ही डिनरसाठी प्रसिद्ध नसलेल्या फ्रेंड्ससोबत जाता, तेव्हा तुम्ही जेवणाचे बिल अर्धे भरता की संपूर्ण बिल तुम्हीच भरता. या युजरच्या प्रश्नावर शाहरूख खानने मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे. यावर शाहरूखने ट्विट केले की, प्रसिद्ध असणे किंवा नसणे याचाशी काहीच संबंध नसतो. पण बिल तेच भरतात. कारण मी पैसे घेऊन कुठेच जात नाही.

तब्बल दोन वर्षानंतर आता शाहरूख कमबॅक करतो आहे. त्याने एक नाही 2 नाही तब्बल तीन चित्रपट साईन केले आहेत. शाहरुख खान लवकरच पठाण सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यानंतर तो राजकुमार हिरानी आणि एका दाक्षिणात्य फिल्ममेकरच्या चित्रपटातही काम करणार आहे.

एकीकडे शाहरूखच्या पठाण चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असताना अशी माहिती मिळते आहे की शाहरुख खान पहिल्यांदाच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील दिग्दर्शक एटली यांच्यासोबत काम करणार आहे. या सिनेमामध्ये शाहरुखचा डबल रोल असेल. या आधी त्याने ड्युप्लीकेट आणि डॉन या सिनेमांमध्ये डबल रोल साकारला होता. त्यानंतर आता तिसऱ्यांदा शाहरूख डबल रोल करणार आहे. यामध्ये शाहरुख मुलगा आणि वडीलांची भूमिका साकारणार आहे. 2 पिढ्यांमधील अंतर हा विषय या सिनेमामध्ये हाताळला जाणार आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: OMG ..! Shah Rukh Khan never pays the bill in a restaurant, find out the reason behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.