देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या आयुष्यात सध्या अनेक घटना घडत आहेत. तुम्हाला तर ठाऊक आहेच की, अशातच निकच्या वहिनीने म्हणजेच प्रियांकाच्या जाऊबाईंनी  एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आता मात्र, आमच्याकडे एक नवी बातमी आहे. ती म्हणजे प्रियांका-निकच्या घरात आणखी एका सदस्याने एंट्री घेतली आहे. जाणून घ्यायला नक्कीच तुम्ही उत्सुक असालच, हा नवा सदस्य दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा नवा कुत्रा पांडा आहे. त्याला हे दोघे घरी घेऊन आले आहेत. त्याचा फोटो शेअर करून ही गुड न्यूज चाहत्यांसोबत तिने शेअर केली आहे.

सध्या देसी गर्ल प्रियांका पती निक जोनाससोबत अमेरिकेत तिचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. प्रियांका तिच्या सासरच्या सदस्यांसोबत अनेकदा एन्जॉय करताना दिसली आहे. तिने तिचे विविध कार्यक्रमांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिला पाळीव प्राण्यांबद्दल विशेष आस्था आहे. त्यांच्याकडे अगोदरच दोन कुत्रे आहेत. आता त्यांनी नव्या कुत्र्याला दत्तक घेतले आहे. त्यांचा हा नवा कुत्रा ऑस्ट्रेलियन  शेपर्ड मिक्स ब्रीड जातीचा आहे. तिच्या या कुत्र्यासोबतचा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की,‘आमचा नवा फॅमिली फोटो..कुटुंबात तुझे स्वागत पांडा..’ निकने देखील त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर फोटो शेअर केला आहे. 

 


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ‘New Guest’ at the home of Priyanka Chopra and Nick Jonas; Photo shared 'Good News'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.