बॉलिवूडमधील सर्वांत रोमँटिक कपलपैकी एक कपल म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली. गेल्या काही दिवसांपासून अनुष्का दोन बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. एक म्हणजे तिचा बिकनी लूकमधील फोटो तर दुसरे म्हणजे तिची प्रेगनन्सी. तिची प्रेगनन्सीची बातमी खरी की खोटी हे आता तीच सांगेल. पण, तुम्हाला माहितीये का, तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात त्यांच्या घरी नवी पाहुणी आल्याचं ती सांगतेय. तुम्हाला बघायचीय ही नवी पाहुणी? तर मग बघा....

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का बॉलिवूडपासून लांब आहे. सध्या ती पती विराट कोहलीसोबत वेस्ट इंडिजमध्ये एंजॉय करत आहे. पण बॉलिवूडपासून दूर झाल्यानं अनुष्काच्या प्रेग्नन्सीबाबत मागच्या काही दिवासांपासून उलट सुलट चर्चा सुरू आहेत. पण नुकतंच अनुष्का शर्माने सोशल मीडियावरून गुड न्यूज शेअर केली आहे. विराट अनुष्काच्या घरी एक छोटी पाहुणी आली असून तिचा फोटो अनुष्कानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या नव्या पाहुणीचं स्वागत अनुष्का आणि विराटनं अनोख्या पद्धतीनं करताना दिसले आहेत.

काही दिवसांपूर्वीच एकमेकांसोबत वेळ घालवतानाचा विराट-अनुष्काचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याशिवाय बीचवरील अनुष्काच्या बिकिनी लूकचीही खुप चर्चा झाली होती. त्यानंतर आता अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या घरी आलेल्या छोट्या पाहुणीचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये एक मांजर दिसत आहे. जी दूध पित आहे. अनुष्का शर्माने हा फोटो शेअर करताना लिहिलं, ‘आमची आजची डिनर गेस्ट’

 अनुष्का शर्मा शाहरुख खानसोबत ‘झीरो’ सिनेमात शेवटची दिसली होती. त्यानंतर तिनं कोणताही सिनेमा साइन केलेला नाही. त्यामुळे तिच्याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. सिनेमात काम करण्याविषयी अनुष्काने कोणताही खुलासा केलेला नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  New guest at Anushka-Virat's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.