Neetu Chandra Birthday Special : लेस्बियन फोटोशूटमुळे नीतू चंद्रा आली होती चर्चेत, आता दिसते अशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 06:00 AM2021-06-20T06:00:00+5:302021-06-20T06:00:02+5:30

नीतू चंद्राने 2005 मध्ये आलेल्या गरम मसाला सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमात तिने अक्षय कुमारच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती.

Neetu Chandra Birthday Special : Neetu Chandra look now | Neetu Chandra Birthday Special : लेस्बियन फोटोशूटमुळे नीतू चंद्रा आली होती चर्चेत, आता दिसते अशी

Neetu Chandra Birthday Special : लेस्बियन फोटोशूटमुळे नीतू चंद्रा आली होती चर्चेत, आता दिसते अशी

Next
ठळक मुद्देगरम मसाला नंतर ट्रॉफिक सिग्नल, वन टू थ्री, समर 2007, ओए लकी! लकी ओए! अशा अनेक सिनेमांमध्ये ती दिसली होती.

बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत नीतू चंद्रा हिचेही एक नाव आहे. २००५ मध्ये अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम स्टारर ‘गरम मसाला’ या चित्रपटाद्वारे नीतूने डेब्यू केला होता. याच नीतूचा आज (२० जून) वाढदिवस. बिहारच्या पाटणा येथे जन्मलेली नीतू एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पाटण्यात तिचे शालेय शिक्षण झाले. यानंतर दिल्ली विद्यापीठातून तिने पदवीचे शिक्षण घेतले. १९९७ मध्ये वर्ल्ड तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तायक्वांडोमध्ये तिला ब्लॅक बेल्डने सन्मानित करण्यात आले आहे.

नीतूने ग्लॅमरच्या जगात पाऊल ठेवले, ते मॉडेलिंगद्वारे. कॉलेजच्या दिवसांतच तिने मॉडेलिंग सुरु केले होते. याचदरम्यान ती एका मोठ्या वादात सापडली होती. होय, एक लेस्बियन फोटोशूट करून तिने वाद ओढवून घेतला होता. मॉडेल कृषिका गुप्तासोबतच्या लेस्बियन फोटोशूटवरून मोठे वादळ उठले होते. अनेक लोकांनी याला विरोध दर्शवला होता.

याशिवाय २०१० मध्ये क्रिकेट मॅच फिक्सिंगमध्येही नीतूचे नाव समोर आले होते. नीतूने वादग्रस्त क्रिकेटपटू मोहम्मद आसिफसोबत मॅसेजची देवाण-घेवाण करत क्रिकेट आणि फिक्सिंगबाबत चर्चा केली होती, असा दावा इंटरपोल व स्कॉटलँड यार्डने केला होता.

नीतू चंद्राने 2005 मध्ये आलेल्या गरम मसाला सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमात तिने अक्षय कुमारच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. नीतूच्या भूमिकेचे नाव स्वीटी होते. गरम मसालामुळे नीतू लाईमलाईटमध्ये आली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. या सिनेमानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या.

गरम मसाला नंतर ट्रॉफिक सिग्नल, वन टू थ्री, समर 2007, ओए लकी! लकी ओए! अशा अनेक सिनेमांमध्ये ती दिसली होती. बॉलिवूडशिवाय तिने तमिळ, तेलुगू , कन्नड आणि भोजपुरी सिनेमांमध्ये सुद्धा काम केले आहे. नीतू शेवटची कुछ लव जैसा या सिनेमात दिसली होती. हा सिनेमा 2011 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली.

बॉलिवूडपासून नीतू जरी लांब असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. ती इन्स्टाग्रामवर तिचे वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Neetu Chandra Birthday Special : Neetu Chandra look now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app