सारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या चौकशी दरम्यान NCB कडून झाली होती मोठी चूक, मग टीमने उचलले हे पाऊल

By गीतांजली | Published: September 29, 2020 12:59 PM2020-09-29T12:59:58+5:302020-09-29T13:12:18+5:30

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीकडून एक मोठी चूक झाली आहे.

Ncb forgets to take shraddha kapoor sara ali khan signatures after seizing phones visits their home to collect | सारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या चौकशी दरम्यान NCB कडून झाली होती मोठी चूक, मग टीमने उचलले हे पाऊल

सारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या चौकशी दरम्यान NCB कडून झाली होती मोठी चूक, मग टीमने उचलले हे पाऊल

googlenewsNext

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीकडून एक मोठी चूक झाली आहे. एनसीबीने शनिवारी झालेल्या सारा अली खान आणि श्रद्धा कपूरच्या चौकशी दरम्यान त्यांचे फोन जप्त केले होते. एबीपी न्यूजचच्या रिपोर्टनुसार मोबाईल जप्त केल्यानंतर सारा आणि श्रद्धाच्या सही घ्यायला एनसीबी अधिकारी विसरले. त्यामुळे आपली चूक सुधारण्यासाठी एनसीबीने दोघींच्या घरी जाऊन त्यांची सही घेतली आहे.  

एनसीबीने सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आलेल्या ड्रग्स अँगलच्या पार्श्नभूमीवर बॉलिवूडमधील ए लिस्टर्स अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांची चौकशी केली. या अभिनेत्रींचे ड्रग्स चॅटसमोर आल्यानंतर त्यांना चौकशीसाठी एनसीबीने बोलवले होते. चौकशीनंतर एनसीबीने या अभिनेत्रींचे मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत.


मोबाईल जप्त केल्यावर सही घ्यायला विसरले
एबीपीच्या रिपोर्टनुसार चौकशीनंतर एनसीबीने सारा अली खान आणि श्रद्धा कपूरचा मोबाईल तर जप्त केला मात्र सही घ्यायला विसरले. यानंतर एक टीम साराच्या घरी तर एक टीम श्रद्धाच्या घरी  जाऊन दोघींच्या सही घेऊन आली. याशिवाय दीपिका, सारा, श्रद्धा आणि रकुलप्रीतने एकसारखचा जबाब दिल्या कारणाने एनसीबी त्यांना पुन्हा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलवणार आहे. 


आर्थिक व्यवहाराची तपासणी होणार
याप्रकरणात एनसीबी दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग आणि सारा अली खानचे आर्थिक व्यवहाराचीदेखील तपासणी करणार आहे. सगळ्या अभिनेत्रींच्या बँक अकाऊंटची तपासणी होणार. एनसीबीने या अभिनेत्रींच्या शेवटच्या तीन क्रेडिट कार्डचा तपशील आधीच तपासला आहे. 

माध्यमांना माहिती पुरविल्याबद्दल ताकीद
बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनबद्दल एनसीबीकडे एनडीपीएस कलमान्वये दोन गुन्हे दाखल असून, दोन टीमकडून तपास सुरू आहे. मात्र, एका टीमकडून संबंधिताची माहिती, तपशील, सेलिब्रिटींची नावे आदींची शहानिशा करण्यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे पोहोचवली जात आहे, त्याबद्दल दुसऱ्या टीमच्या अधिकाऱ्यांनी डीजीना पत्र लिहून नाराजी कळविली होती. या प्रकाराबद्दल बैठकीत अस्थाना यांनी अधिकाऱ्यांना खडसावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

NCBने जप्त केलेत तब्बल 45 फोन, उडाली ‘बॉलिवूड’ची झोप!!

सुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार? एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल

 

Web Title: Ncb forgets to take shraddha kapoor sara ali khan signatures after seizing phones visits their home to collect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.