Motion poster of Prabhas' Radheshyam makes history, reaches 25 million views | प्रभासच्या 'राधेश्याम'च्या मोशन पोस्टरने रचला इतिहास, गाठला २५ मिलियन व्ह्यूजचा आकडा

प्रभासच्या 'राधेश्याम'च्या मोशन पोस्टरने रचला इतिहास, गाठला २५ मिलियन व्ह्यूजचा आकडा

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा आगामी चित्रपट राधेश्यामचे २३ऑक्टोबरला म्हणजे त्याच्या वाढदिवशी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या मोशन पोस्टरला 'बीट्स ऑफ राधेश्याम' म्हटले गेले, त्याने इतिहास रचला आहे. केवळ ४ दिवसांमध्ये, या पोस्टरने २५ मिलियन व्ह्यूजचा आकडा पार केला असून ते 'भारतीय सिनेमाचे मोस्ट व्ह्यूड मोशन पोस्टर' बनले आहे. हे पोस्टर आपल्याला ‘राधेश्याम’च्या जगाची झलक दाखवतो, जी एक शाश्वत प्रेमकहाणी आहे.  

राधेश्याम या चित्रपटात प्रभाससोबतपूजा हेगडे दिसणार आहे. पडद्यावर या दोघांची मंत्रमुग्ध करणारी केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार आहे. सर्व चाहते उत्सुक असून अभिनेता आणि अभिनेत्रीचा या आधी कधीच न पाहिलेल्या लूकचे देखील खूप कौतूक होत आहे. इटलीच्या अस्सल सौंदर्यपूर्ण वातावरणात चित्रीकरणाची प्रक्रिया सुरु असून प्रभास आणि पूजा दोघेही विक्रमादित्य आणि प्रेरणाच्या व्यक्तिरेखेत आकर्षक दिसत आहेत.


‘राधेश्याम’च्या घोषणेपासूनच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळतो आहे. प्रभासचे चाहते चित्रपटाशी जोडलेली प्रत्येक गोष्ट जाणण्यासाठी उत्सुक आहेत. चित्रपट त्याच्या पहिल्या घोषणेपासूनच सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे.


‘राधेश्याम’ एक बहुभाषीक चित्रपट असून राधा कृष्ण कुमार यांच्याद्वारे दिग्दर्शित करण्यात येत आहे. हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरीज द्वारे प्रस्तुत आणि यूवी क्रिएशंस द्वारे निर्मित आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Motion poster of Prabhas' Radheshyam makes history, reaches 25 million views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.