ठळक मुद्दे२००५ मध्ये मिनिषाने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती. पण यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. कारण या सर्जरीमुळे तिचा पूर्ण लूक बदलला. प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वीचा आणि त्यानंतरचा तिचा चेहरा पाहून अनेकांना धक्का बसला होता.

मिनिषा लांबाचा आज म्हणजेच १८ जानेवारीला वाढदिवस आहे. ती मुळची दिल्लीची असली तरी तिचे काही शिक्षण चेन्नई तर काही शिक्षण श्रीनगरमध्ये झाले आहे. कॉलेजमध्ये असतानाच तिने तिच्या मॉडलिंग करियरला सुरुवात केली. तिने अनेक जाहिरांतीमध्ये काम केले आहे. ती त्या काळात जाहिरात क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा होती. कॉलेजमध्ये शिकत असतानाच मिनिषाला चित्रपट ऑफर झाला आणि २००५ मध्ये सुजीत सरकारच्या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला. २००८ मध्ये रणबीर कपूरसोबत ‘बचना ऐ हसीनों’ मध्ये तिची वर्णी लागली. हा चित्रपट सुपरहिट झाला. यानंतर कॉपोर्रेट, हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड, दस कहानियां अशा अनेक सिनेमांत ती झळकली.

पण यानंतर तिच्या करिअरला ओहोटी लागली आणि मिनिषाला वेगळे क्षेत्र निवडणे भाग पडले. आता ती एक प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे. खुद्द तिनेच एका मुलाखतीत ही माहिती दिली होती.

२००५ मध्ये मिनिषाने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती. पण यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. कारण या सर्जरीमुळे तिचा पूर्ण लूक बदलला. प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वीचा आणि त्यानंतरचा तिचा चेहरा पाहून अनेकांना धक्का बसला होता. प्लास्टिक सर्जरीमुळे मिनिषाचा चेहरा पूर्णपणे बिघडला. त्यामुळे तिला चांगल्या ऑफर्स मिळणे बंद झाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘भूमी’ हा तिचा अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटात मिनिषा एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती. यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले. तिने छूना है आसमान, तेनाली रामा, इंटरनेटवाला लव्ह यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तसेच ती बिग बॉस मध्ये देखील झळकली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Minissha lamba Birthday Special : plastic surgery changes minisha's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.