Malaika worried about seeing Arjun Kapoor's photo | अर्जुन कपूरचा फोटो पाहून मलायका चिंतीत; कमेंट बॉक्समध्ये अर्जुनने दिले ‘हे’ उत्तर!
अर्जुन कपूरचा फोटो पाहून मलायका चिंतीत; कमेंट बॉक्समध्ये अर्जुनने दिले ‘हे’ उत्तर!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या चर्चेत आहे. ते म्हणजे फक्त एका गोष्टीमुळे. ती म्हणजे मलायका अरोरासोबतची त्याची रिलेशनशिप. बरं, अजुन या दोघींनी ही रिलेशनशिप सार्वजनिकरित्या मान्यही केलेली नाही. मध्यंतरी त्यांच्या लग्नांच्या चर्चा जोरात होत्या. आता मात्र, तसे काहीही दिसत नाही. दोघेही आपापल्या जगात आनंदी आहेत. नुकतेच अर्जुन कपूरने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात तो खूपच गंभीर दिसत आहे. तेव्हा मलायका अरोराने चिंतीत होऊन गंभीर असण्याचं कारण विचारलं तर त्याने ‘हे’ उत्तर दिले.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते दोघे नेटिझन्सकडून ट्रोलही होतात. अर्जुनने सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले आहेत. ज्यात ते खूपच गंभीर दिसत आहेत. तो यात शर्टला टाय बांधून घेताना दिसतोय. ते तिन्ही फोटो मलायका अरोराने पाहिले तेव्हा तिने अर्जुनला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारला,‘का तू एवढा गंभीर दिसत आहेस?’ त्यावर अर्जुनने उत्तर दिले, ‘मी विचार करत होतो की, टाय बांधणं किती कठीण काम आहे ते. ’ अर्जुनचे हे फोटो ‘इंडियन स्पोर्टस ऑनर्स समारोह’ मधील असून या सोहळयाचे होस्टिंग त्याने केले आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात सोशल मीडियावर अशा प्रकारची चर्चा होत असते. 

अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, तो त्याचा आगामी चित्रपट ‘पानीपत’ मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर यांनी केले आहे. यात अर्जुन कपूर शिवाय संजय दत्त आणि कृती सेनन हे देखील असणार आहेत. याशिवाय अर्जुनजवळ ‘संदिप और पिंकी फरार’ हे चित्रपट देखील आहेत. 


Web Title: Malaika worried about seeing Arjun Kapoor's photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.