कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे सेलिब्रिटी कधी नव्हे ते आपआपल्या घरात कैद आहेत. पण हो सोशल मीडियावर मात्र सेलिब्रिटी कधी नव्हे इतके अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. अशात सेलिब्रिटींचे जुने फोटो, त्यांच्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत. याचदरम्यान बॉलिवूडची ग्लॅमरस बाला मलायका अरोरा हिच्या अलिशान घराची झलकही पाहायला मिळतेय. तिच्या अपार्टमेंंटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर पाहुया मलायकाच्या अलिशान घराचे काही इनसाईड फोटो...

2016 मध्ये मलायकाने अरबाज खानशी घटस्फोट घेतला आणि तिने त्याचे घर सोडले. यानंतर मलायका एका नव्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली. हे घर मलायकाने स्वत: खरेदी केले आहे.

या घरात मलायका तिचा 19 वर्षाचा मुलगा अरहानसोबत राहते.

मलायकाने घराच्या भींती आणि सिलिंग लाइट कलरने सजवले आहे.
 

मलायकाच्या घराचा हा लॉबी एरिया आहे. घरातील हा कोपरा काहीसा खास आहे. कारण सण कुठलाही असो, याठिकाणी मलायकाचा एक फोटो नक्की ठरलेला असतो.

लिव्हिंग रुम मलायकाने अतिशय खास पद्धतीनं सजवली आहे. आवडीचे फर्निचर लावून तिने लिव्हिंग रूम सजवली आहे. अनेकदा मलायका या ठिकाणी बसून फोटो क्लिक करताना दिसते.  

तिचा डाइनिंग हॉलही सुरेख सजवलेला आहे. याठिकाणावरून बाहेरचा नजारा दिसतो.


 

 घराची बाल्कनी ही मलायकाची सर्वात आवडती जागा आहे. झाडांनी सजवलेल्या या बाल्कनी बसून निवांत वेळ घालवते.

लॉकडाऊनच्या काळात मलायकाने किचनमधील अनेक व्हिडीओ शेअर केलेत. तिचे किचन अगदी साध्या पद्धतीने सजवलेले आहे.

हे आहे मलायकाचे बेडरूम. अनेकदा याच बेडरूममधून तिने मॉर्निंग सेल्फी घेत सोशल मीडियावर शेअर केली.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Malaika Arora’s new home is chic and stylish just like her-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.