ठळक मुद्देमलायकाचा हा ड्रेस जोहाना ऑर्डिझने डिझाईन केला होता.

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोमुळे तर कधी फिटनेसमुळे ती चर्चेत येते. तिला नुकतेेच तिचा प्रियकर अर्जुन कपूरसोबत मुंबईत पाहाण्यात आले. ती ईस्टर निमित्त आपल्या पालकांना अर्जुन आणि मुलासोबत भेटायला गेली होती. त्यावेळी तिने घातलेल्या बॅकलेस ड्रेसची चांगलीच चर्चा झाली होती. 

मलायकाने घातलेल्या या ड्रेसमधील डिप कट नेकलाइन आणि बॅकलेस डिझाइन यामुळे हा ड्रेस अनेकांना आवडला होता. हा ड्रेस पाहाताना अतिशय साधा दिसत असला तरी हा खूपच खास आहे. हा ड्रेस पाहून तो प्रचंड महाग असेल असे कोणालाच वाटले नव्हते. पण हा ड्रेस खास डिझाईन केलेला असून याची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

मलायकाचा हा ड्रेस जोहाना ऑर्डिझने डिझाईन केला होता आणि या ड्रेसची किंमत तब्बल दोन लाख रुपये आहे. मलायका नेहमीच महागडे डिझायनर कपडेच परिधान करते. त्यामुळेच तिच्या स्टाईलची नेहमीच चर्चा रंगते. या ड्रेससोबत तिने घातलेल्या गळ्यातील लॉकेटने देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने एम अद्याक्षराचे भलेमोठे लॉकेट घातलेले असून ते या ड्रेसवर चांगलेच सूट होत होते. तसेच तिने या ड्रेससोबत महागडे घड्याळ देखील घातले होेते. या घड्याळाची किंमत तब्बल 34 लाख रुपये असल्याचे म्हटले जाते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: malaika arora yellow glamorous dress is so costly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.