ठळक मुद्देमोठी मुलगी पूजा भट्ट हिच्यासोबतच्या लिपलॉक सीनवरून झालेला वाद तर सगळ्यांनाच ठाऊक आहे.

‘लव्ह, सेक्स, धोखा’अशा थीम्सवर अनेक हिट चित्रपट देणारे निर्माता-दिग्दर्शक महेश भट यांचा आज (20 सप्टेंबर) वाढदिवस. महेश भट त्यांच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच अधिक चर्चेत राहिले, त्यांच्या एक ना अनेक वादांचीच चर्चा जास्त झाली.

म्हणे, अनौरस अपत्य
महेश भट्ट यांच्या आई-वडिलांचे विधीवत लग्न झाले नव्हते. त्याअर्थाने मी अनौरस अपत्य आहे, असा उल्लेख  एका मुलाखतीत महेश भट यांनी केला होता. महेश भट विवाहसंस्थेला फार महत्त्व देत नाहीत, ते याचमुळे.

कॉलेजमध्ये असतानाच पडले प्रेमात

महेश भट्ट वयाच्या 20 व्या वर्षी कॉलेजमध्ये असताना लोरिए ब्राईट हिच्या प्रेमात पडले. आज तिला किरण भट्ट म्हणून ओळखले जाते. पूजा भट्ट आणि राहुल भट्ट हे किरण व महेश भट्ट यांची मुले. 

अन् पहिला संसार मोडला
 महेश भट यांच्याशी लग्नानंतर लोरिए ब्राईटनेआपले नाव बदलून किरण भट केले. दोघांना दोन मुलं झालीत.किरणसोबत संसार सुरळीत सुरु असतानाच महेश भट यांच्या आयुष्यात अचानक परवीन बाबीची एन्ट्री झाली. महेश व अभिनेत्री परवीन बाबी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. या बातम्यांनी किरण अस्वस्थ झाल्या़  संसार विस्कटला.

लिव्ह इन ते नात्याचा शेवट

पत्नीला सोडून महेश भट परवीन बाबीसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागले, पण या नात्याचा अखेर दु:खद ठरला. महेश भट यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच परवीन यांना पॅरनॉईड स्क्रिझोफेनिया या आजाराने गाठले. आपल्याला कोणतीरी मारून टाकणार, अशी भीती परवीन यांना वाटायची. त्यांना वेगवेगळे भास व्हायचे.  या कठीण काळात महेश भट परवीन यांना सांभाळले. पण परवीन यांचा आजार बळावला. सरतेशेवटी  फिलॉसफरच्या सल्ल्यावर महेश भट परवीन यांच्यापासून वेगळे झाले आणि या नात्यावर पडदा पडला.

पत्नीला घटस्फोट न देताच केले दुसरे लग्न

परवीन बाबीसाठी महेश भट यांनी पहिल्या पत्नीला सोडले. पण परवीन बाबीसोबतचे नातेही संपुष्टात आले. यानंतर महेश भट यांच्या आयुष्यात सोनी राजदान आल्या.
विशेष म्हणजे, सोनी राजदानसोबतच्या अफेअरदरम्यानही किरण आणि महेश एकत्र राहत होते. यानंतर किरणला घटस्फोट न देताच महेश यांनी सोनी राजदानसोबत लग्न केले. 1986  साली या दोघांचे लग्न झाले, शाहीन आणि आलिया भट या दोघांच्या मुली.

पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केले असते...

मोठी मुलगी पूजा भट्ट हिच्यासोबतच्या लिपलॉक सीनवरून झालेला वाद तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. एका मॅगझिनने महेश भट्ट पूजाला किस करत असतानांचा फोटो छापला होता. या फोटोमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, महेश यांच्या यानंतरच्या एका वक्तव्याने या वादाच्या आगीत तेल ओतले होते. पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केले असते, असे महेश म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची प्रचंड निंदा झाली होती.

मुलासोबतचे संबंध

मुलगा राहुल भट्टसोबत महेश यांचे नाते फार मधूर नाही. मी एका अन्य स्त्रीसाठी घर सोडून जातोय, हे राहुल पाहत होता. त्यामुळे आम्हा बाप-लेकाचे नाते खराब होत गेले. अर्थात हे नाते पूर्र्णपणे संपले नाहीच, असे महेश अलीकडे बोलताना म्हणाले होते.
 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mahesh bhatt birthday special these are controversial life facts of bollywood director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.