दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबाला व चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. पण, आज त्याच्या कुटुंबाशी निगडीत बातमी समोर आल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे.

खरेतर चिरंजीवी सरजाचे निधन झाले होते तेव्हा त्याची पत्नी मेघना राज प्रेग्नेंट होती आणि आज तिने मुलाला जन्म दिला आहे. इतकेच नाही तर मेघनाच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

यात चिरंजीवीचा भाऊ ध्रुव सरजाच्या हातात पहायला मिळाले आहे आणि चिरंजीवीच्या फोटोसोबत मुलाचा फोटो काढला आहे.

या आनंदाच्या क्षणी कुटुंबासोबतच चाहतेदेखील चिरंजीवीला मिस करत आहेत. चाहत्यांनी बाळाचा फोटो शेअर करत लिहिले की, चिरंजीवी सरजा परत आला आहे.

चिरंजीवी आणि मेघनाच्या मुलाचा जन्म आज बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात झाला आहे. त्यावेळी चिरंजीवी व मेघनाच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. चिरंजीवीचे चाहते खूप खूश असून ते बाळाचे फोटो ट्विट करत आहेत.


मेघना राज या महिन्याच्या सुरूवातीपासून खूप चर्चेत आली होती. जेव्हा तिच्या ओटभरणीचे फोटो समोर आले होते. या फोटोंमध्ये ती नवरा चिरंजीवीच्या कार्डबोर्ड कटआऊट सोबत पोझ देताना दिसली होती. त्यावेळी तिने फोटो शेअर करत लिहिले होते की, माझ्या जीवनातील दोन सर्वात स्पेशल व्यक्ती. ही ती कल्पना आहे चिरूला आपल्यासोबत ठेवण्याची आणि माझी इच्छा आहे की तो सदैव माझ्यासोबत असावा. माझे तुमच्यावर प्रेम आहे बेबी मा.


चिरंजीवीच्या निधनाच्या काही दिवसानंतर मेघनाने आपल्या पहिल्या मुलाची घोषणा केली होती.

तिने एक पोस्ट लिहिली की, माझे अनमोल गिफ्ट, आमच्या प्रेमाची निशाणी येणार आहे. त्यासाठी मी नेहमी तुमची आभारी राहिन. मी आपल्या बाळाच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे. तुमच्या स्माईलला पुन्हा एकदा पाहण्यासाठी आता प्रतीक्षा करू शकत नाही. तुमचे एक हास्य संपूर्ण खोलीला प्रकाशित करत होते. मी तुमची वाट पाहते आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Late actor Chiranjeevi Sarja's wife Meghna gives birth to a child, fans say - 'Chiranjeevi is back ..'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.