पटौडी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. शर्मिला टागोर, सैफ अली खान, सोहा अली खान, करीना कपूर आणि आता सारा अली खान या सगळ्यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. पटौडी कुटुंबातील एक सदस्य आहे ज्याचा बॉलिवूडशी दूरदूरपर्यंत कोणताच संबंध नाही. ही व्यक्ती म्हणजे सैफ अली खानची बहिण सबा अली खान. सबा सैफपेक्षा छोटी आणि सोहापेक्षा मोठी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सबा अली खानकडे जवळपास २७०० कोटी रुपये संपत्ती आहे. 

सैफ आणि सोहा यांच्यामध्ये अभिनय कौशल्य त्यांची आई शर्मिला टागौर यांच्याकडून मिळालं आहे. मात्र सबा पहिल्यापासूनच लाइमलाइटपासून दूर आहे. त्यामुळेच तुम्ही तिच्याबद्दल फार कमी ऐकलं आहे.

फॅमिली फंक्शनशिवाय ती कुठेच दिसत नाही. प्रोफेशनने ती ज्वेलरी डिझायनर आहे.

नेहमी कॅमेऱ्यापासून दूर असणाऱ्या सबाने कधीच चित्रपटात काम करण्याबाबत विचार केला नाही. कारण ती खूप लाजाळू आहे. सबाने काही दिवसांपूर्वी स्वतःचं डायमंड रेंज सुरू केली होती. एका मुलाखतीत सबाने सांगितले होते की मी कधीच अभिनयात येण्याचा विचार केला नाही. मला आनंद आहे की मी जे काम करते तिथे माझे खूप नाव आहे.

सबाने तिची वहिनी करीनासाठी काही ज्वेलरी डिझाईन केल्या आहेत. ४२ वर्षीय सबाने आतापर्यंत लग्न केले नाही. सबाचे करीनासोबत खूप चांगले बॉण्डिंग आहे. बिझनेस व्यतिरिक्त सबा नवाब कुटुंबाची कोटींच्या संपत्तीची देखरेख करते आहे.

संपत्तीच्या कामाव्यतिरिक्त ती औकाफ-ए-शाही नामक एका संस्थेची प्रमुख आहे. 


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kareena Kapoor's Sister in law Saba Ali Khan is still single, know about her life interesting facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.