kareena kapoor khan to start shooting for film veere di wedding sequel after delivery | 'वीरे दी वेंडिग'चा येणार सीक्वल, डिलेव्हरीनंतर करिना कपूर सुरु करणार शूटिंग

'वीरे दी वेंडिग'चा येणार सीक्वल, डिलेव्हरीनंतर करिना कपूर सुरु करणार शूटिंग

बॉलिवूडचा हिट सिनेमा ‘वीरे दी वेडिंग’ सिक्वल बनणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. यात अभिनेत्री करिना कपूर, स्वरा भास्कर, सोनम कपूर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका होत्या. . या चित्रपटाची निर्मिती सोनम कपूरची बहीण रिया कपूर यांनी केली होती. सिनेमाच्या यशानंतर रिया कपूरला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तिने सांगितले होते की, 'वीर दी वेडिंग' चित्रपटाचा सिक्वल बनवता येईल.

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, सिनेमाचा सीक्वल  ‘वीरे दी वेडिंग’च्या कलाकारांनाच घेऊन तयार करण्यात येणार आहे. यासाठी निर्मात्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल, कारण करिना कपूर प्रेग्नेंट आहे. डिलेव्हरीनंतर करीना कपूर खान सीक्वलच्या शूटिंगला सुरुवात करु शकते असा अंदाज आहे. करीना कपूर खान जेव्हा वेळ देण्यास तयार असेल, तेव्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू करता येईल.

योगायोग म्हणजे 'वीरे दी वेडिंग'च्या पहिल्या भागाच्या शूटिंग दरम्यानही करिना प्रेग्नेंट होती आणि तैमूरच्या जन्मानंतर तिने सिनेमाची शूटिंग केली होती. या सिनेमाच्या सीक्वलपूर्वी करिना कपूर पुन्हा प्रेग्नेंट आहे.  काही दिवसांपूर्वीच करिना 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग पूर्ण करुन दिल्लीवरुन मुंबईत परतली आली आहे. या सिनेमात करिना आणि आमिर खानची मुख्य भूमिका असणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kareena kapoor khan to start shooting for film veere di wedding sequel after delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.