ठळक मुद्देकरिनाने कुणालला विचारले की, तुझे आणि सोहाचे भांडण झालं तर सगळ्यात पहिल्यांदा सॉरी कोण बोलतं. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता कुणालने सांगितले की सगळ्यात पहिल्यांदा मीच माफी मागतो कारण सोहाच्या डिक्शनरीमध्ये सॉरी हा शब्दच नाहीये.

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक जोडी म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर खान. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. १६ ऑक्टोबर २०१२ साली सैफ आणि करिना लग्नबेडीत अडकले होते. त्यांच्या लग्नाला आता आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव तैमूर आहे. तो लहानपणापासून प्रचंड लोकप्रिय आहे. तर करिना आणि सैफ आता दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत.


करिनाच्या ‘वॉट वुमन वॉन्ट’या चॅट शो ची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या शोमध्ये नुकतीच कुणाल खेमुने हजेरी लावली होती. कुणाल हा करिनाची नणंद सोहा अली खानचा नवरा आहे. करिना आणि कुणाल यांच्यात देखील खूप चांगली फ्रेंडशिप आहे. त्यांनी गोलमाल रिटर्न्स या चित्रपटात देखील एकत्र काम केले होते. या कार्यक्रमादरम्यान करिनाने कुणालला विचारले की, तुझे आणि सोहाचे भांडण झालं तर सगळ्यात पहिल्यांदा सॉरी कोण बोलतं. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता कुणालने सांगितले की सगळ्यात पहिल्यांदा मीच माफी मागतो कारण सोहाच्या डिक्शनरीमध्ये सॉरी हा शब्दच नाहीये. 

कुणालची ही गोष्ट ऐकल्यानंतर करिना म्हणाली की, माझ्यात आणि सैफ मध्ये जरी भांडण झालं तर नेहमीच सैफ माफी मागतो. माझ्यामते पुरुषच नेहमी सॉरी बोलतात. कारण तेच चुका करतात असे म्हणत करिना हसायला लागली. 

सैफ आणि अमृता सिंग यांचे लग्न १९९१ साली झाले होते. या लग्नाला सुरुवातीला सैफच्या घरातून विरोध होता. सैफ आणि अमृता यांच्यामध्ये अमृता १२ वर्षांनी मोठी आहे. पण सैफ अमृताच्या प्रेमात आकंठ बुडाला असल्याने त्याने तिच्यासोबत लग्न केले. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा घटस्फोट २००४ मध्ये झाला आणि २०१२ मध्ये सैफने करीनासोबत लग्न केले.

सैफ आणि करीनाच्या लग्नानंतर सैफची मुले सारा आणि इब्राहिम यांचे करिनासोबत खूपच चांगले नाते आहे. ते दोघे अनेकवेळा सैफ आणि करिनाचा मुलगा तैमुर अली खान याच्यासोबत देखील दिसतात. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kareena Kapoor khan on fights with Saif Ali Khan: ‘He is the one who always says sorry’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.