जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय. करीना कपूरचा वंडरबॉय असलेल्या तैमूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला फोटो नेहमीपेक्षाही खास आहे. यावेळी तैमूर योगा करताना पाहायला मिळत आहे.

अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली करिना तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. तिच्या पहिल्या आणि दुस-या प्रेग्नंसी दरम्या या गोष्टीची प्रचिती आली. नेहमी योगा करताना ती दिसली होती. करिना कपूरचे फिटनेस प्रेम पाहून तैमूरदेखील आत्तापासूनच देतोय फिटनेसवर लक्ष. तैमूरचा योगा करतानाचा फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे.

खुद्द करिनाने तैमूरचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. फोटो पाहून चाहतेच नाही तर सेलिब्रेटी देखील कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सगळ्यांच्या नजरा तैमूरवर असल्या तरी त्याचं बालपण जपणं ही माझी आणि सैफची पालक म्हणून जबाबदारी आहे असं बॉलीवूडची बेगम अभिनेत्री करीना कपूर खान हिने म्हटलं होते. त्यामुळे आत्तापासून त्याला सगळ्या गोष्टींची सवय लागायली हवी यावर ती जास्त मेहनत घेते. 


तैमूर माझ्यात आणि सैफमध्ये गुंतला आहे. आम्ही कुठेही जात असलो तरी तो आमच्यासोबत असतो. मी किंवा सैफ शूटिंगला जात असलो तरी तो सोबत असतो. सात महिन्यांचा असल्यापासून तो आमच्यासोबत प्रवास करतोय. आमच्या जीवनशैलीसह त्यानं जुळवून घेणं गरजेचं आहे.आजचं डिजीटल युग आहे. त्यातच आम्ही कलाकार असल्याने सगळ्यांच्या नजरा तैमूरवर असतात. तरीही तैमूरचे फोटो काढावे असं सगळ्यांना का वाटतं माहिती नाही. 

मात्र हरकत नाही. तैमूरला कोणत्याही बाळाप्रमाणे आम्ही वाढवत आहोत. त्याचे फोटो काढले जातील म्हणून त्याला बाहेर जाण्यापासून आम्ही रोखू शकत नाही. इतर मुलांसारखं त्यालाही जीवन जगणं गरजेचं आहे. त्याला बाहेर जाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. त्याचं बालपण कुणीच हिरावून घेऊ शकत नसल्याचे करिनाने सांगितले होते. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kareena Kapoor Khan can't decide if Taimur Ali Khan is stretching after a nap or doing yoga, see pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.