19 वर्षांत इतका बदला 'कभी खुशी कभी गम'मधील शाहरुख-काजोलचा मुलगा जिब्रान खान, आता दिसतो असा

By गीतांजली | Published: December 5, 2020 12:53 PM2020-12-05T12:53:51+5:302020-12-05T12:55:00+5:30

. 2001 मध्ये आलेल्या सिनेमाला 19 वर्षे झाली आणि त्यानंतर जिब्रानमध्येही बरेच बदल झाले आहेत.

Kajol and shahrukh khan onscree son jibraan khan becomes actor see photos | 19 वर्षांत इतका बदला 'कभी खुशी कभी गम'मधील शाहरुख-काजोलचा मुलगा जिब्रान खान, आता दिसतो असा

19 वर्षांत इतका बदला 'कभी खुशी कभी गम'मधील शाहरुख-काजोलचा मुलगा जिब्रान खान, आता दिसतो असा

googlenewsNext

'कभी खुशी कभी गम' या सिनेमाला भारतीय चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान आहे. आजही लोकांना हा चित्रपट बघायला आवडतो. शाहरुख खान, काजोल, अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन आणि करिना कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बऱ्याच लोकप्रिय झाला. इतकेच नाही तर या सिनेमात काजोल आणि शाहरुख खानच्या मुलाची भूमिका साकारणार्‍या बालकलाकार जिब्रान खानसुद्धा रसिकांना भावला. 2001 मध्ये आलेल्या सिनेमाला 19 वर्षे झाली आणि त्यानंतर जिब्रानमध्येही बरेच बदल झाले आहेत. निरागस मुलाची भूमिका साकारणाऱ्या जिब्रान खानची पर्सनालिटी जबरदस्त आहे.

इतकेच नाही तर इतर सर्व सेलिब्रिटींप्रमाणेच जिब्रान खानही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतो. इन्स्टाग्रामवर त्याला 1 लाख 40 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. जिब्रान अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. शुक्रवारी 27 वर्षांचा झालेला जिब्रान खान सध्या आपल्या आगामी सिनेमा 'ब्रह्मास्त्र'च्या तयारीत बिझी आहे. रणबीर कपूर, आलिया भटसोबत तो 'ब्रह्मास्त्र'. 

'कभी खुशी कभी गम' या सिनेमात शाहरुख आणि काजोल एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर लग्न करतात आणि यूकेमध्ये स्थायिक होतात. त्याच वेळी, त्यांना एक मुलगा आहे. त्या मुलाच्या भूमिकेत जिब्रान खान दिसला होता. या मल्टीस्टारर फॅमिली ड्रामा सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. एवढेच नाही तर या चित्रपटाच्या गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करण जोहरने केले होते, तर यश जोहर निर्माते होते.

Web Title: Kajol and shahrukh khan onscree son jibraan khan becomes actor see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.