Kajal aggarwal shares first photo with fiance gautam kitchlu set to tie the knot on 30th october | काजल अग्रवालने पहिल्यांदा शेअर केला तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो, तीन दिवसांवर आलंय लग्न

काजल अग्रवालने पहिल्यांदा शेअर केला तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो, तीन दिवसांवर आलंय लग्न

अभिनेत्री काजल अग्रवाल 30 ऑक्टोबरला उद्योगपती गौतम किचलूसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. लग्नाच्या आधी काजोलने होणाऱ्या नवऱ्यासोबतचा फोटो पहिलांदा शेअर केला आहे. या फोटोत काजल आणि गौतम ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतायेत. गौमतने काळ्या रंगाचा कुर्ता घालता आहे तर काजलने पंजाबी ड्रेस घातला आहे. दोघे या फोटोत एकमेकांसोबत खूप खुश दिसतायेत.   

काजल आणि गौतम मुंबईत लग्न करणार आहेत, ज्यात फक्त कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक सामील होणार आहेत. काजलने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. काजलने सांगितले होते की, सध्याच्या परिस्थितीमुळे लग्नाचा कार्यक्रम खासगी ठेवण्यात आला आहे. काजलच्या लग्नाची तयारी सध्या जोरदार सुरु आहे. गौतम एक बिझनेसमन आहे. 

काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता.त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता.काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून.साऊथमध्ये काजलला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kajal aggarwal shares first photo with fiance gautam kitchlu set to tie the knot on 30th october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.