ठळक मुद्देजुहीला जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहे. सोशल मीडियावर फार क्वचितच ती या दोघांचे फोटो पोस्ट करते.

जुही चावला ही बॉलिवूडची गुणी अभिनेत्री. मनमोहक हास्याने आणि अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकणा-या जुहीने एक काळ गाजवला. अनेक हिट सिनेमे दिलेत. तिने बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे केलेत, जे फक्त मुलांसाठी व तरूणाईसाठी होते. यापैकी काही सिनेमे तिने आपल्या मुलांना दाखवले. यावर जुहीच्या मुलांनी काय रिअ‍ॅक्शन दिली माहितीये? मुलांनी तिचे हे सिनेमे पाहण्यास नकार दिला. 
एका ताज्या मुलाखतीत जुहीने स्वत: हे सांगितले. माझे सिनेमे पाहतांना माझ्या मुलांना लाजीरवाणे वाटते. विशेषत: माझे जुने चित्रपट पाहण्यात त्यांना काहीही इंटरेस्ट नाही. माझा कुठलाच जुना सिनेमा त्यांनी पाहिलेला नाही.

आई, काय यात रोमान्स आहे?
एकदा माझे पती जय मेहता यांनी मुलांना माझा ‘हम है राही प्यार के’ हा सिनेमा पाहण्याास सुचवले. हा एक सुंदर सिनेमा आहे, असे त्यांनी मुलांना सांगितले. यावर माझा मुलगा अर्जुनने मला काय प्रश्न केला माहितीये? आई यात रोमान्स आहे का? असे त्याने मला विचारले. यावर हो, ही एक रोमॅन्टिक कॉमेडी आहे, असे मी त्याला सांगितले. यावर त्याने हा सिनेमा पाहण्यास नकार दिला. ज्यात तुझा रोमान्स आहे, तो सिनेमा मी पाहणार नाही. पडद्यावर पाहताना खूप विचित्र वाटते. म्हणूनच मी तुझे सिनेमे पाहत नाही, असे अर्जुनने मला स्पष्ट सांगितले. एकंदर काय तर त्यांना माझे सिनेमे बघायचेच नाहीत.असे जुही म्हणाली.

मला हे अपेक्षित नव्हते...
माझ्या मुलांनी आजपर्यंत केवळ माझ्या दोन सिनेमांची प्रशंसा केली. एक म्हणजे, ‘मैं कृष्णा हूं’ आणि दुसरा म्हणजे, ‘चॉक अ‍ॅण्ड डस्टर’. या सिनेमाच्या प्रीव्ह्यूला मी मुलांना व त्यांच्या मित्रांना घेऊन गेले होते. हे दोन्ही सिनेमे माझ्या मुलांना आवडले. ‘चॉक अ‍ॅण्ड डस्टर’ पाहिल्यानंतर अर्जुनने माझी खूप प्रशंसा केली होती. चांगला सिनेमा होता. तू खरोखरच खूप चांगले काम केलेय, असे तो म्हणाला होता. त्याचे ते शब्द ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मला त्याच्याकडून या रिअ‍ॅक्शनची अपेक्षाच नव्हती, असे हसतहसत जुही म्हणाली.

‘या’ कारणामुळे जुही चावलाने लपवली होती लग्नाची गोष्ट

जुहीला जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहे. सोशल मीडियावर फार क्वचितच ती या दोघांचे फोटो पोस्ट करते. या दोघांनाही प्रसारमाध्यमे आणि झगमगाटापासूनच दूर ठेवण्याचे तिने पसंत केले.  1995 साली जुहीने बिझनेसमॅन जय मेहतासोबत लग्न केले. अनेक वर्षे जुहीच्या लग्नाची भणकही कुणाला लागली नाही. तिने अगदी पद्धतशीरपणे हे लग्न जगापासून लपवून ठेवले होते. होय, एका  मुलाखतीत जुहीने लग्न लपवण्यामागच्या कारणांचा खुलासा केला होता. ती म्हणाली, ‘त्यावेळी इंटरनेट नव्हते. प्रत्येक फोनमध्ये कॅमेराही नव्हता. त्यामुळे माझे लग्न झालेय, हे लपवणे सहज शक्य झाले. लग्न झाले त्यादरम्यान मी यशाच्या शिखरावर होते. मला लग्नानंतरही काम करायचे होते. लग्नाचा खुलासा केला तर करिअर संपेल, अशी भीती मला होती. त्यामुळे मी शांत बसले आणि काम करत राहिले.’

या कारणामुळे जुही चावलाचे आमिर खानसह झाले होते जोरदार भांडण, 'इश्क' सिनेमानंतर कधीच केले नाही एकत्र काम

या प्रसिद्ध अभिनेत्याला करायचे होते जुही चावलासोबत लग्न, तिच्या वडिलांकडे घातली होती लग्नासाठी मागणी

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: juhi chawla says that her son said i do not want to see your films that feature romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.