ठळक मुद्देशाहरुखसोबत प्रेक्षकांना जुही चावलाची जोडी देखील आवडते. त्या दोघांनी राजू बन गया जंटलमॅन, डर, यस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी, राम जाने यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने काजोलसोबत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कभी खुशी कभी गम यांसारख्या त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. पण शाहरुखसोबत प्रेक्षकांना जुही चावलाची जोडी देखील आवडते. त्या दोघांनी राजू बन गया जंटलमॅन, डर, यस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी, राम जाने यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एवढेच नव्हे तर खऱ्या आयुष्यात ते दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंडस असून ते दोघे बिझनेस पार्टनर देखील आहेत.

शाहरुख आणि जुही यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा खूपच रंजक आहे. जुहीनेच या भेटीविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. आमिर खान आणि जुही चावला यांची जोडी प्रेक्षकांना कयामत से कयामत तक या चित्रपटात पाहायला मिळाली होती आणि ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे हीच जोडी प्रेक्षकांना पुन्हा राजू बन गया जंटलमन या चित्रपटात पाहायला मिळावी यासाठी या चित्रपटाचे निर्माते प्रयत्न करत होते. पण काही कारणांनी जुही आणि आमिर यांना चित्रपटात एकत्र घेणे चित्रपटाच्या निर्मात्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे आमिर ऐवजी शाहरुखला या चित्रपटासाठी साईन करण्यात आले. 

जुहीने एका मुलाखतीत सांगितले होते की, राजू बन गया जटंलमन या चित्रपटासाठी मला निर्माते विवेक वासवानी यांनी साईन केल्यावर मी हिरोबाबत विचारले होते. त्यावर या चित्रपटाचा नायक टेलिव्हिजनवरील स्टार असून अगदी आमिरसारखा दिसतो असे त्यांनी सांगितले होते. सेटवर पहिल्यांदा मी शाहरुखला पाहिले त्यावेळी मी विवेक यांना म्हणाले होती, हा कुठून तुम्हाला आमिरसारखा दिसतो... माझ्यासोबत धोका झाला आहे.  

पुढे जुहीने या मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी शाहरुख खूप बारीक होता. त्याचे केस खूप मोठे होते, ते खांद्यापर्यंत येत असत.... तसेच तो सावळा होता. पण मी चित्रपट साईन केला असल्याने चित्रपटात काम करायला तयार झाले. शाहरुखसोबत काम करायला मजा आली. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूपच चांगला आहे. त्यामुळे या चित्रपटानंतर आम्ही खऱ्या आयुष्यात देखील खूप चांगले फ्रेंड्स झालो. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: juhi chawla first reaction after meeting shahrukh khan on the set of raju ban gaya gentleman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.