अलीकडेच बॉलिवूडमधील सुपरहिट सिनेमा 'जब वी मेट'ला 13 वर्षे पूर्ण झाली. करिना कपूरने या निमित्ताने शाहिद कपूर आणि इम्तियाज अलीसोबतचा फोटो शेअर करत सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला होता. आम्ही तुम्हाला या सिनेमाशी संबंधीत एक किस्सा सांगणार आहोत. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनेता बॉबी देओल पूर्वी या सिनेमात करिना कपूरसोबत दिसणार होता, परंतु बॉबी देओल शेवटच्या क्षणी सिनेमातून बाहेर पडला आणि त्यांच्या जागी अभिनेता शाहिद कपूरची एंट्री झाली. मीडिया रिपोर्टनुसार यामागील कारण करिना कपूर होती. 


जब वी मेट सिनेमासाठी बॉबी देओल पहिली पसंत होता, याचा खुलासा स्वत: बॉबीने केला होता. रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान बॉबी देओल म्हणाला, माझी जागीनंतर सिनेमात शाहिदची वर्णी लागली. इम्तियाज अलीने मला 'जब वी मेट'मधील भूमिका ऑफर केली होती, मी पण लगेच होकार दिला होता. 


 आधी मेकर्सनी बॉबी देओच्या नावाला पसंती दिली होती. शाहिद कपूरची एन्ट्री ब-याच उशीरा झाली. ते सुद्धा करिना कपूरच्या हट्टापायी. करिनाच्या हट्टापायी बॉबी या चित्रपटातून बाद झाला अन् त्याच्या जागी शाहिद कपूरची वर्णी लागली. ‘जब वी मेट’ हा चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अलीचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यामुळे या चित्रपटासाठी तो कोणतीही तडजोड करण्याच्या मूडमध्ये नव्हता. या चित्रपटासाठी त्याने बॉबी देओलची निवड केली होती. बॉबीची निवड केल्यानंतर इम्तियाजने चित्रपटाच्या निर्मितीसाठी अष्टविनायक प्रॉडक्शनची भेट घेतली. परंतु अष्टविनायक प्रॉडक्शन या चित्रपटात करिना कपूर हवी होती


करिनाच्या नावाला कुणाचाच विरोध नव्हता. ना इम्तियाजचा, ना बॉबीचा. दोघांनीही तिच्या नावाला होकार दिला. त्यानुसार, करिनाशी संपर्क केला गेला. पण करिना म्हटल्यावर ती सहज कशी मानणार? तिनेही अट ठेवली. होय, शाहिद कपूर हिरो असेल तरच मी हा चित्रपट करणार, ही तिची अट होती. असे का याचा अंदाज तुम्हीही बांधू शकता. याचे कारण म्हणजे, करिना त्यावेळी शाहिदला डेट करत होती. म्हणून तिला शाहिद हवा होता.तिच्या या अटीने सगळ्यांचीच गोची झाली. अखेर इम्तियाजला करिनाची ही अट मान्य करावी लागली. मग काय, बॉबी देओलचा पत्ता आपोआट कट झाला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jab we met 13 years bobby deol was replaced by shahid kapoor because of kareena kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.