ठळक मुद्देकाला असे बाबीलच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या काश्मीरमध्ये सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तृप्ती डिमरी मुख्य भमिकेत दिसणार आहे.

अनुष्का शर्माची निर्मिती असलेला बुलबुल हा चित्रपट प्रेक्षकांना गेल्या वर्षी पाहायला मिळाला होता. याच चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक एक नवीन चित्रपट घेऊन येत असून अनुष्काच या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अनुष्का या चित्रपटात एका नव्या अभिनेत्याला संधी देणार आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून इरफान खानचा मुलगा बाबील असल्याची चर्चा रंगली आहे.

इरफान खानने केवळ बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले होते. इरफानचे गेल्या वर्षी निधन झाले. त्याच्या निधनाने एक गुणी कलाकार आपण गमावला. आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या मुलाने चित्रपटसृष्टीत येण्याचा विचार केला आहे. बाबीलला अभिनेता बनायचे आहे असे त्याने काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते आणि आता त्याला चित्रपटात काम करण्याची संधी देखील मिळाली असून अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याला लाँच करणार असल्याचे म्हटले जात आहे.

काला असे बाबीलच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या काश्मीरमध्ये सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तृप्ती डिमरी मुख्य भमिकेत दिसणार आहे. तृप्तीला बुलबुल या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. 

बाबीलने करीब करीब सिंगल या चित्रपटाच्या टीममध्ये असिस्टंट म्हणून काम केले होते. तसेच अनेक नाटकांच्या ग्रुपमध्ये देखील बाबील सक्रिय असतो. सोशल मीडियावर देखील तो सध्या मोठ्या प्रमाणात त्याचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Irrfan Khan's son Babil Khan to make his acting debut in Anushka Sharma's upcoming production?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.