क्रिती सनॉन सांगतेय, "कलाकार म्हणून मी या गोष्टीचा विचार कधीच करत नाही"

By गीतांजली | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:00+5:30

बरेली की बर्फीनंतर लुका छिपीमधील आपल्या अभिनयाचे लाखो चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारी बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन करण जौहर दिग्दर्शित कलंक चित्रपटामध्ये एका आयटम सॉन्गमधून दिसून आली.

I never think about the advantages or disadvantages of cinema said kriti sanon | क्रिती सनॉन सांगतेय, "कलाकार म्हणून मी या गोष्टीचा विचार कधीच करत नाही"

क्रिती सनॉन सांगतेय, "कलाकार म्हणून मी या गोष्टीचा विचार कधीच करत नाही"

गीतांजली आंब्रे 

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी क्रिती सनॉन एक आहे. करिअरची सुरुवात क्रितीने मॉडलिंगपासून केली.मॉडेलिंग, तेलगू चित्रपट आणि बॉलिवूड असा तिचा प्रवास राहिला.  'राब्ता' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. क्रितीने तब्बल 4 सिनेमा या वर्षी रिलीज झाले.  लुका छुप्पी, अर्जुन पटियाला, हाऊसफुल 4,आणि 'पानीपत'मध्ये क्रिती दिसणार आहे. पानीपतमध्ये ती पार्वती बाईंची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने क्रितीशी साधलेला हा खास संवाद     

पानीपतच्या माध्यमातून तू पहिल्यांदा 'पीरियड ड्रामा' सिनेमाचा भाग बनली आहेस, यासाठी तू वेगळी तयारी कशी केलीस ?
कथेच्या मागणीनुसार मला मराठी येणं गरजेचे होते. माझे जे मराठीतीले संवाद आहे ते ऐकताना अस्सलखित मराठी वाटेल पाहिजे होते. अनेक वेळा मी दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांना विचारायची एखादा शब्द अडला तर. घोडेस्वारी आणि तलावरबाजीचे प्रशिक्षण घेतले. नऊवारी साडी नेसून जी एक तुमची देहबोली गरजेची असते मी त्यावर काम केले. कधीकधी तुम्ही पेहराव केलात की आपणच ती भूमिका तुमच्यात येऊन जाते.

पार्वती बाईंच्या भूमिकेने तुला काय दिलं ?
पार्वती बाईं खो़डकर तर होत्याच पण त्याचसोबत त्या बिनधास्त देखील होत्या. त्याकाळी सुद्धा आपल्या नवऱ्याकडे त्या जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुली द्यायला घाबरायच्या नाहीत. हे सगळे असतानाच त्या खंबीर होत्या, हुशार होत्या. एक अशी वेळ येते ज्यावेळी त्यांच्यामुळे संपूर्ण सैन्याला खूप मोठी मदत होते. मला वाटते त्यांच्यातील हे सगळेच गुण मला शिकायला हवेत.

तू आतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमा केले आहेत, त्यामुळे असा कोणता जॉनर आहे जो तुला करायचा आहे?
मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते सहा वर्षांच्या करिअरमध्ये मला वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमा करायला मिळाले.  सगळ्या भूमिका वेगळ्या होत्या, कोणत्याही कलाकारासाठी हे चांगली गोष्ट असते. मला नितळ प्रेम कथेवर आधारित सिनेमात काम करायाचे आहे. तसेच मला थ्रीलर सिनेमांमध्ये काम करायचे आहे.

पानीपत सिनेमाचा तुझ्या करिअरला किती फायदा होईल असे वाटतेय ?
मी सिनेमा करताना कधी फायदा किंवा नुकसान याचा कधीच विचार करत नाही. हा, पण मी प्रयत्न करते की प्रत्येक भूमिकेतून एक कलाकार म्हणून काही तरी शिकू शकेन. पानीपतबाबत बोलायचे झाले तर हा सिनेमाचा माझ्या करिअरसाठी कित्ती फायदा हाईल हे सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकच सांगू शकतील.

तुझ्या आगामी प्रोजेक्टबाबत जाणून घ्यायला आवडले ?
मी मीमीमध्ये दिसणार आहे. जो सिनेमा सरोगसीवर आधारित आहे. मराठी सिनेमा मला आई व्हायचंय याचा तो रिमेक आहे. यात माझ्यासोबत सई ताम्हणकरसुद्धा आहे. 40 टक्के सिनेमाचे शूटिंग झाले आहे. उरलेले शूटिंग आम्ही फेब्रुवारीमध्ये करणार आहोत. मला या सिनेमातून अभिनेत्री म्हणून बऱ्याच गोष्टी शिकण्याची संधी मिळते आहे. लक्ष्मण उत्तेकर यांच्यासोबत माझा हा दुसरा सिनेमा आहे. या आधी मी त्यांच्या लुकाछुपी सिनेमात काम केले आहे. त्यामुळे आमच्यामध्ये एक ट्युनिंग आधी पासूनच आहे. यानंतर मी बच्चन पांडेमध्ये सुद्धाही दिसणार आहे. यात मी आणि अक्षय कुमार स्क्रिन शेअर करणार आहे.

Web Title: I never think about the advantages or disadvantages of cinema said kriti sanon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.