ठळक मुद्देहृतिकला या चित्रपटानंतर ३० हजार लग्नाचे प्रस्ताव आले होते. पण त्यावेळी हृतिक सुझान खानच्या प्रेमात होता. हृतिक इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनच त्याचे सुझानसोबत अफेअर सुरू होते.

कहो ना प्यार है या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांसोबत, समीक्षकांचे देखील मन जिंकले. या चित्रपटाला फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. सगळ्याच जास्त फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारा हा चित्रपट ठरला. या चित्रपटामुळे हृतिक रोशनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. हृतिकचा हा पहिला चित्रपट असला तरी या चित्रपटात त्याने रोहित आणि राज अशा दोन वेगवेगळ्या भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या. या पहिल्याच चित्रपटासाठी हृतिकला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हृतिकने पहिल्याच चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर दमदार एंट्री केली. कहो ना प्यार है या चित्रपटानंतर मुली हृतिकच्या मागे अक्षरशः वेड्या झाल्या होत्या. या चित्रपटानंतर हृतिकला लग्न करण्याचे अनेक प्रस्ताव देखील आले होते.

कहो ना प्या है या चित्रपटाला १४ जानेवारीला २१ वर्षं पूर्ण झाले. या चित्रपटामुळे बॉलिवूडला एक हँडसम हिरो मिळाला. हृतिकला या चित्रपटानंतर ३० हजार लग्नाचे प्रस्ताव आले होते. पण त्यावेळी हृतिक सुझान खानच्या प्रेमात होता. हृतिक इंडस्ट्रीत येण्याआधीपासूनच त्याचे सुझानसोबत अफेअर सुरू होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहीच वर्षांत म्हणजेच २० डिसेंबर २००० ला सुझान आणि हृतिकने लग्न केले.

या चित्रपटातील अमिषा पटेल आणि हृतिक रोशनची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. कहो ना प्यार है या चित्रपटाने बॉलिवूडला एक सुपरस्टार मिळवून दिला. अमिषा पटेलला देखील या चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटानंतर तिला अनेक चांगल्या बॅनरच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अमिषा पटेलच्या आईने देखील या चित्रपटात काम केले होते. राजच्या आईच्या भूमिकेत आपल्याला आशा पटेल यांना पाहायला मिळाले होते. 

कहो ना प्यार है या चित्रपटातील नृत्याची देखील चांगलेच कौतुक झाले होते. हृतिकची सिग्निचर स्टेप्स तर त्याकाळात चांगलीच फेमस झाली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hrithik Roshan reveals he got 30,000 marriage proposals after Kaho Naa Pyaar Hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.