ठळक मुद्देमुकेश हे दिल्लीचे होते आणि त्यांची अनेक हॉटेल्स होती. रेखा आणि मुकेश यांची कॉमन फ्रेंडसच्या माध्यमातून ओळख झाली होती.

अभिनेत्री रेखा यांना कधीच प्रेमात यश मिळाले नाही. रेखा या दिसायला अतिशय सुंदर असल्या तरी त्यांना त्यांच्या आयुष्यात समजून घेणारा असा जोडीदार मिळाला नाही. त्या गेल्या अनेक वर्षांपासून एकट्याच राहातात. त्यांनी मुकेश अग्रवालसोबत लग्न केले होते. पण लग्नानंतर काहीच महिन्यात मुकेश यांनी आत्महत्या केली. 

रेखा यांचे बालपण अतिशय कष्टात गेले. रेखा यांचे वडील प्रसिद्ध अभिनेते जैमिन गणेशन... त्यांना किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखले जात असे तर रेखा यांची आई पुष्पावली देखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. पण गणेशन आणि पुष्पावली यांना मुलं असली तरी त्यांनी लग्न केलेले नव्हते. त्यामुळे रेखा यांना अनौरस म्हटले जात असे. याच गोष्टीचा राग असल्याने रेखा यांनी त्यांच्या वडिलांसोबत कधी कोणत्याही प्रकारचे नाते ठेवले नाही. 

रेखा आणि अमिताभ यांची प्रेमकथा एकेकाळी प्रचंड गाजली होती. विवाहित अमिताभ रेखा यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते असे म्हटले जाते. पण या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी मौन राखणेच पसंत केले. रेखा यांना त्यांच्या अनेक नात्यांमध्ये अपयशच मिळाले. अभिनेता विनोद मेहरा यांच्यासोबत देखील रेखा यांचे अफेअर असल्याच्या चर्चा त्याकाळात रंगली होती. 

1990 मध्ये रेखा यांनी लग्न करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मुकेश अग्रवाल या व्यवसायिकासोबत रेखा यांनी लग्न केले होते. मुकेश हे दिल्लीचे होते आणि त्यांची अनेक हॉटेल्स होती. रेखा आणि मुकेश यांची कॉमन फ्रेंडसच्या माध्यमातून ओळख झाली होती. रेखा आणि मुकेश यांनी जुहूतील एका देवळात लग्न केले होते. रेखा या प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरी हे लग्न अतिशय साधेपणात करण्यात आले होते. पण लग्नाच्या दोनच महिन्यात त्यांच्यात वाद व्हायला लागले असे म्हटले जाते. कारण रेखा यांनी दिल्लीला जाण्याचे प्रमाण खूपच कमी केले होते.

रेखा यांनी चित्रपटात काम करू नये अशी मुकेश यांची इच्छा होती. पण काही केल्या रेखा चित्रपटसृष्टी सोडायला तयार नव्हत्या. त्यामुळे लग्नाच्या सहाच महिन्यात रेखा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण या घटनेमुळे मुकेश डिप्रेशनमध्ये गेले होते असे म्हटले जाते. या घटनेनंतर काहीच महिन्यात मुकेश यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Here's all about Rekha and Mukesh Aggarwal's relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.