Have you ever spent a night with someone ?, was Sarah's answer to Kareena's question | तू कोणासोबत एक रात्र व्यतित केली आहेस का?, करीनाच्या या प्रश्नावर साराने दिले हे उत्तर

तू कोणासोबत एक रात्र व्यतित केली आहेस का?, करीनाच्या या प्रश्नावर साराने दिले हे उत्तर

बॉलिवूडची बेबो उर्फ करीना कपूर आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्यात सावत्र आई-मुलीचे नाते आहे. बऱ्याच मुलाखतींमध्ये त्या दोघी एकमेकींबद्दल सांगतात. काही दिवसांपूर्वी जेव्हा सारा अली खान करीनाचा शो व्हॉट वुमेन व्हांटमध्ये गेली होती.त्यावेळी करीनाने साराला बरेच प्रश्न विचारले होते. त्यावेळी बेबोने साराला तू कोणासोबत रात्र व्यतित केली आहेस का, असेदेखील विचारले होते. त्यावर साराने उत्तर दिले होते. 


सारा अली खानला या शोमध्ये करीनाने बरेच खासगी प्रश्न विचारले होते. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, करीनाने सारा अली खानला विचारले की तू कधी कोणाला नॉटी मेसेज पाठवले आहेस का?, या प्रश्नासोबत करीना म्हणाली की तुझे वडीलांनी ऐकू नये म्हणून मी विचारत नाही. प्रश्नांवर थोडा विचार करून साराने लाजत उत्तर हो दिले. त्यानंतर करीना कपूरने सारा अली खानला आणखीन एक खासगी प्रश्न विचारला. करीना कपूरने साराला म्हटले की मला विचारले नाही पाहिजे पण आपण मॉर्डन लोक आहोत. कधी वन नाइट स्टॅण्ड केले आहेस. वन नाइट स्टॅण्ड म्हणजे कोणासोबत तरी एक रात्र व्यतित करणे. करीना कपूरच्या या प्रश्नावर सारा अली खानने थोडे आडेवेडे घेत उत्तरात सांगितले की मी असे कधीच केले नाही. त्यानंतर करीना सुटकेचा निश्वास घेतला. 


करीना आणि सारा दोघींमध्ये आई-मुलीच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नात अधिक आहे. सैफने २०१२ मध्ये करीना कपूरसोबत लग्न केलं.त्यानंतर करिनानेही तैमुरला जन्म देत बॉलिवूडपासून ब्रेक घेत संसारात रमली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Have you ever spent a night with someone ?, was Sarah's answer to Kareena's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.