Hathras Gangrape: Criminals should be hanged in public, says Riteish Deshmukh | Hathras Gangrape : 'गुन्हेगारांना सर्वांसमोर फासावर लटकवलं पाहिजे', रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया

Hathras Gangrape : 'गुन्हेगारांना सर्वांसमोर फासावर लटकवलं पाहिजे', रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १५ दिवसांपूर्वी एका १९ वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या नराधमांनी तिची जीभ कापली, गंभीर अवस्थेत असलेल्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी पीडितेचे मृत्यूशी झुंज संपली. गेल्या दोन आठवड्यांपासून जीवन व मृत्यूशी लढाई लढत असलेल्या हाथरस येथील चंदपा भागातील तरुणीने आज दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर या घटनेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनेदेखील सोशल मीडियावर या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

रितेश देशमुखने ट्विट करत लिहिले की, इतका निर्दयीपणा आणि भयानक गुन्हा करणाऱ्या दोषींना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवले पाहिजे.

पीडित मुलगी १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्काराला बळी पडली होती आणि तिची प्रकृती सोमवारी बिघडल्यानंतर तिला अलीगडच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. मंगळवारी सकाळी सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी आरोपींनी महिलेचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पीडितेने स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपींनी तरुणीची जीभ कापली होती. गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या तरुणीवर उपचार सुरू होते, मात्र या पीडितेला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.

नराधम आरोपींनी निर्दोष पीडित मुलीवर बलात्कारच केला नाही तर तिची मान मोडली, पाठीचे हाड मोडले आणि तिची जीभ कापली. इतक्या गंभीर स्थितीनंतर पीडितेने पोलिसांना आपला जबाब नोंदवणं सोपे नव्हते. पण धाडसी मुलगी धैर्य गमावले नाही आणि आरोपींविषयी पोलिसांना सर्व काही सांगितले.

पीडितेची प्रकृती चांगली नसतानाही नोंदवला जबाब
चंदपा परिसरातील घडलेल्या या घटनेचा सीओ सादाबाद स्तरावर तपास सुरू आहे. या घटनेनंतर तपासात काय केले गेले आहे, यासह त्याने संपूर्ण प्रकरणांचा अहवाल आपल्या उच्च अधिकाऱ्यांना पाठविला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. 14 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर मुलीला जेएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची जीभ कापली गेली होती आणि मान देखील तुटली होती. १९ सप्टेंबरला जेव्हा कार्यवाहक सीओ सादाबाद महिला कॉन्स्टेबलसमवेत तिचा जबाब नोंदवण्यासाठी आली, तेव्हा पीडितेची प्रकृती फारशी चांगली नव्हती. तिची प्रकृती पाहून जबाब नोंदविणारी टीमही भावनिक झाली. स्वतःवर होणारे हल्ले आणि क्रौर्य याबद्दल ती मुलगीच सांगू शकत होती. हल्ल्याबरोबरच 20 सप्टेंबरला छेडछाड करण्याचे कलम वाढविण्यात आले. त्यानंतर सीओ सादाबाद या प्रकरणात २१ सप्टेंबर रोजी जेव्हा जबाब नोंदविण्यासाठी आले तेव्हा कुटुंबीयांनीही मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. यावर, सीओ २२ सप्टेंबर रोजी पुन्हा महिला कॉन्स्टेबलसह परत आले, जेव्हा मुलीने हावभाव करत घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, गुन्ह्यात काही कलम वाढवून, चारही आरोपींना तुरूंगात पाठविण्यात आले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hathras Gangrape: Criminals should be hanged in public, says Riteish Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.