genelia d'souza shoot with Riteish Deshmukh for advertisement despite injury | हाताला दुखापत होऊनही चित्रीकरणासाठी पोहोचली जेनेलिया डिसूजा, साडीत आले सौंदर्य खुलून

हाताला दुखापत होऊनही चित्रीकरणासाठी पोहोचली जेनेलिया डिसूजा, साडीत आले सौंदर्य खुलून

ठळक मुद्देजेनेलिया खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. रितेशने कुर्ता-पायझमा घातला असून त्यांची जोडी नेहमी सारखीच खूप छान दिसतेय असे त्यांचे चाहते त्यांना कमेंटद्वारे सांगत आहेत. 

जेनेलिया डिसूजा देशमुखच्या हाताला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली असून तिच्या हाताला प्लास्टर आहे. पण तरीही ती सोशल मीडियावर डान्स करतानाचे, मस्ती करतानाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. आता तर तिने त्या अवस्थेत चित्रीकरण देखील केले आहे.

जेनेलियाने पती रितेश देशमुखसोबत नुकतेच एका जाहिरातीसाठी चित्रीकरण केले. त्या दोघांना नुकतेच चित्रीकरण झाल्यानंतर स्टुडिओच्या बाहेर पाहाण्यात आले, त्यावेळी जेनेलियाने सुंदर साडी नेसली होती. या साडीत तिचे सौंदर्य खुलून आले होते. जेनेलिया खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. रितेशने कुर्ता-पायझमा घातला असून त्यांची जोडी नेहमी सारखीच खूप छान दिसतेय असे त्यांचे चाहते त्यांना कमेंटद्वारे सांगत आहेत. 

काही दिवसांपूर्वी स्केटिंग शिकत असताना पडल्याने जेनेलियाच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे तिच्या हाताला प्लास्टर लावण्यात आले आहे. जेनेलियाने ही दुखापत कशी झाली हे सांगणारा एक व्हिडिओदेखील चाहत्यांसोबत शेअर केला होता. जेनेलियाच्या हाताला प्लास्टर असल्याने रितेश तिची प्रचंड काळजी घेत आहे. तो तिचे केस बांधत असल्याचा एक व्हिडिओ तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. जेनेलिया आणि रितेश सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांची प्रत्येक अपडेट ते चाहत्यांसह शेअर करत असतात.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: genelia d'souza shoot with Riteish Deshmukh for advertisement despite injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.