ठळक मुद्देजैदआधी गौहर खानचे नाव टीव्ही अभिनेता कुशल टंडनसोबत जुळले होते.  बिग बॉसच्या घरात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

‘बिग बॉस’ विनर गौहर खान येत्या 25 डिसेंबरला कोरिओग्राफर जैद दरबारसोबत लग्नगाठ बांधणार आहे. साहजिकच या लग्नाची जोरदार चर्चा आहे. सोबत आणखी एका गोष्टीची चर्चा आहे. ती म्हणजे, गौहर व जैद  यांच्या वयातील अंतर. होय, गौहर तिच्या होणा-या पतीपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. यावरून गौहर ट्रोल सुद्धा होत आहे. आता तिने या ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले आहे.

ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत गौहर तिच्या व जैदमधील वयाच्या अंतरावर बोलली. ‘आम्हा दोघांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे, आधी तर ही गोष्ट खोटी आहे. लोकांना चघळायला विषय हवे असतात आणि ते बनवणे सोपे आहे. पण आमच्यात 12 वर्षांचा फरक आहे, हे खोटे आहे. तो माझ्यापेक्षा लहान आहे, हे मी मान्य करते. पण 12 हा आकडा खोटा आहे. तो माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी खूप समजूतदार आणि विचारांनी प्रगल्भ आहे.  वयाच्या अंतरावरून टीका करणे, ट्रोल करणे सोपे आहे. पण याचा त्या जोडप्याच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो, हेही खरे आहे. अर्थात जैद आणि माझ्या नात्यावर अशा ट्रोलिंगचा काहीही परिणाम होणार नाही. आमच्या दोघेही समजूतदार आहोत. तेवढी प्रगल्भता आमच्याकडे आहे. त्यामुळे आमचे नाते खूप मजबूत आहे,’असे ती म्हणाली.

जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे.
तो म्युझिक व्हिडीओ छमियामध्ये शक्ती मोहन आणि वेस्ट इंडीजचा क्रिेकेटर ड्वेन ब्राओसोबत दिसला होता.  

 जैदआधी गौहर खानचे नाव टीव्ही अभिनेता कुशल टंडनसोबत जुळले होते.  बिग बॉसच्या घरात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांचा सोबत एक म्युझिक व्हिडीओ सुद्धा होता. अर्थात कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले होते. या ब्रेकअपदरम्यान दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता. पण आता दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघाले आहेत. जुन्या गोष्टी त्यांनी मागे सोडल्या आहेत.

गौहर खानने शेअर केले प्री-वेडिंगचे फोटो, फियॉन्से जैद दरबारसोबत दिसली रोमँटिक अंदाजात, पहा फोटो

गौहर खानने होणारा पती जैद दरबारसोबत 'बुर्ज खलीफा'च्या खाली केलं ग्लॅमरस फोटोशूट

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: gauahar khan reaction-on age gap with zaid darbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.