Forbes list akshay kumar highest paid bollywood actor of 2020 sixth in world | फोर्ब्सच्या लिस्टमध्ये अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड अभिनेता, इतकी आहे त्याची वर्षाची कमाई

फोर्ब्सच्या लिस्टमध्ये अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड अभिनेता, इतकी आहे त्याची वर्षाची कमाई

फोर्ब्सने 2020 मधील महागड्या अभिनेत्यांची यादी जाहिर केली आहे. यात यादीत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सगळ्यात हाएस्ट पेड अभिनेता ठरला आहे. फोर्ब्सायादीनुसार जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहा जणांच्या यादीत स्थान मिळवणार अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे.  अक्षय यादीत सहव्या क्रमांकावर आहे. अक्षयची कमाई ४८.५ मिलियन डॉलर म्हणजेच ३६२ कोटी रूपये इतकी आहे. अक्षय कुमारची यातील सर्वाधिक कमाई प्रॉडक्ट एंडोर्समेंटमुळे झालेली आहे. ही यादी 1 जून 2019 ते 1 जून 2020 च्या कमाईनुसार तयार करण्यात आली आहे. या यादीत ड्वेन जॉनसन ज्याला सगळे द रॉक नावाने ओळखतात तो पहिल्या स्थानावर आहे. द रॉकची कमाई ८७.५ मिलियन डॉलरची इतकी आहे. 


या यादीतील सर्वाधिक कमाई करणारे पहिले सहा अभिनेते
ड्वेन जॉनसन
रयान रेलॉल्ड्स
मार्क व्हालबर्ग 
बेन एफ्लेक
विन डिजल
अक्षय कुमार

 

अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे.मात्र, न्यूझीलॅंड, ऑस्ट्रेलिया आणि यूएईसारख्या देशातील सिनेमागृहांमध्ये मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ९ नोव्हेंबरला या देशांमधील सिनेमागृहात हा सिनेमा रिलीज केला जाईल. सिने समीक्षक तरण आदर्शने सोशल मीडियावर याची माहिती दिली. तर भारतातील लोक ९ नोव्हेंबरलाच हा सिनेमा डीज्नी हॉटस्टारवर बघू शकणार आहेत.अक्षय सध्या त्याच्या आगामी 'बेल बॉटम' आणि 'पृथ्वीराज' सिनेमाचं शूटींग करत आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला साकारायची होती धोनीची व्यक्तिरेखा,पण सुशांतला देण्यात आली ऑफर

खरंच खिलाडी! 'बेल बॉटम'साठी अक्षय कुमारने मोडला स्वत:चा १८ वर्ष जुना नियम, सगळेच झाले थक्क...

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Forbes list akshay kumar highest paid bollywood actor of 2020 sixth in world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.