ठळक मुद्देचित्रपट असो किंवा वेबसीरिज सैफ सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारतो आहे.

काजोल आणि अजय देवगण यांच्या अभिनयाने सजलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. केवळ तीनच दिवसांत या चित्रपटाने 50 कोटींचा आकडा पार केला. या नव्या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा बनण्याच्या दिशेने या सिनेमाची वाटचाल सुरु आहे. अजय-काजोलशिवाय सैफ अली खान याचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पण या मुख्य कलाकारांनी या सिनेमासाठी किती फी घेतली, हे तुम्हाला ठाऊक आहे का?  आज हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अजय देवगण

अजय देवगणने या सिनेमात सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या सिनेमात अजयने इतका दमदार अभिनय केला आहे की, त्याचे कौतुक करताना लोक थकत नाहीयेत. तान्हाजीच्या भूमिकेसाठी अजयने प्रचंड मेहनत घेतली. तितकीच घसघशीत फी सुद्धा घेतली. होय, अजयला या सिनेमासाठी 30 कोटी इतकी भरमसाठ फी मिळाली.  


काजोल

अजय देवगन आणि काजोल या रिअल लाईफ जोडप्याने या सिनेमाच्या निमित्ताने 11 वर्षांनंतर एकत्र काम केले आहे. काजोलने यात तान्हाजीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने 5 कोटी इतके मानधन घेतले.  

सैफ अली खान

चित्रपट असो किंवा वेबसीरिज सैफ सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारतो आहे. तान्हाजी- द अनसंग वॉरियर त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. यात सैफने नकारात्मक भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी त्याला सुमारे 7 कोटींची भरमसाठ फी मिळाली.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: the fees paid by these 3 actors of Tanhaji: The Unsung Warrior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.