ठळक मुद्देद फॅमिली मॅन वेबसीरिजमधून मनोज वाजपेयीने डिजिटल माध्यमात पदार्पण केले होते. यात त्याने श्रीकांत तिवारीची भूमिका साकारली होती. तो एक सीक्रेट एजेंट आहे.

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅन या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या वेबसीरिजला सप्टेंबरमध्ये एक वर्षं पूर्ण झाल्यानंतर द फॅमिली मॅनच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची दमदार अंदाजात घोषणा केली होती. दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री समांथा अक्किनेनीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसिरिजच्या निमित्ताने ती डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे.

फॅमिली मॅन 2 ही वेबसिरिज 12 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होती. पण काही कारणांनी ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली नाही. ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची प्रेक्षक वाट पाहात आहेत. या वेबसिरिजच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे. ही वेबसिरिज मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

ही वेबसिरिज हिंदीसोबतच भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमध्ये डब केली जाणार आहे. तसेच अनेक विदेशी भाषांमध्ये देखील ही वेबसिरिज डब करण्यात येणार आहे. द फॅमिली मॅन वेबसीरिजमधून मनोज वाजपेयीने डिजिटल माध्यमात पदार्पण केले होते. यात त्याने श्रीकांत तिवारीची भूमिका साकारली होती. तो एक सीक्रेट एजेंट आहे. त्याच्या घरातल्यांसाठी तो एक सामान्य व्यक्ती आहे. तो काय काम करतो हे त्याच्या घरातल्यांना देखील माहीत नाहीये. या वेबसिरिजमध्ये मनोज वाजपेयीसोबत शारीब हाश्मी, नीरज माधव, प्रियामणी, शरद केळकर आणि गुल पनाग हे कलाकार आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Family Man 2: Manoj Bajpayee-starrer to release this month?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.