तुम्हाला इम्युनिटी सिस्टीम स्ट्राँग करायचीय? मग मलायकाने सांगितलेले ‘हे’ हेल्थ ड्रिंक करून बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 06:30 PM2020-07-05T18:30:14+5:302020-07-05T18:36:04+5:30

कोरोना होऊ नये म्हणून प्रत्येक जण तेवढीच काळजी घेत आहे. कोरोनाला आपण बळी पडू नये म्हणून आपण वेगवेगळे आयुर्वेदिक काढे, औषधी घेत आहोत.

Do you want to strengthen your immune system? Then try the health drink that Malaika said ... | तुम्हाला इम्युनिटी सिस्टीम स्ट्राँग करायचीय? मग मलायकाने सांगितलेले ‘हे’ हेल्थ ड्रिंक करून बघा...

तुम्हाला इम्युनिटी सिस्टीम स्ट्राँग करायचीय? मग मलायकाने सांगितलेले ‘हे’ हेल्थ ड्रिंक करून बघा...

googlenewsNext

सध्या जगभरात कोविड १९ या महाभयानक व्हायरसने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोना होऊ नये म्हणून प्रत्येक जण तेवढीच काळजी घेत आहे. कोरोनाला आपण बळी पडू नये म्हणून आपण वेगवेगळे आयुर्वेदिक काढे, औषधी घेत आहोत. तुम्हाला माहित आहे का, बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोराने एक अत्यंत गुणकारी हेल्थ ड्रिंक बनवले आहे. ज्यामुळे तुमची प्रतिकारक्षमता वाढणार आहे. तुम्हाला बनवायचंय का हे हेल्थ ड्रिंक ? तर मग मलायकाने सुरू केलेल्या नव्या सीरिजला तुम्हाला फॉलो करावे लागेल.

मलायका अरोरा ही तिच्या फिटनेसविषयी अत्यंत जागरूक आहे. ती फिटनेस फ्रिक असून स्वत:च्या आरोग्यासाठी ती जागरूक सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते. आता तिने चाहत्यांसाठी एक हेल्दी ड्रिंक बनवले आहे. तिने तिच्या आयजीटीव्हीच्या ‘मलायकाज ट्रीक ऑर  टीप’ या सीरिजवर पोस्ट केले आहे. यापूर्वी तिने अजून एका हेल्दी ड्रिंकच्या रेसिपीबद्दल सांगितले होते. आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिने भारताच्या आयुर्वेदिक पारंपारिक पदार्थांपासून बनवलेल्या हेल्दी ड्रिंक बद्दल माहिती दिली आहे. व्हिडीओ शेअर करत ती सांगते,‘ही एक होम मेड रेमेडी असून खुप वर्ष जुनी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे. आवळा, फ्रेश ऑरगॅनिक  हळद आणि आद्रक यांच्या पासून बनवलेल्या या गुणकारी ड्रिंकमध्ये अ‍ॅपल व्हिनेगर, थोडी मिरची देखील मिक्स केली आहे.’

या हेल्दी ड्रिंकबद्दल पुढे ती सांगते, ‘हे सर्व गुणकारी, आयुर्वेदिक  पदार्थ मिसळून याचे सेवन करा. सध्या वेगवेगळे हेल्दी ड्रिंक  बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, मला असं वाटतं की, तुम्ही  पारंपारिक असलेल्या आयुर्वेदिक काढ्यालाच प्राधान्य द्यावे. हा काढा करून बघा, तुम्हाला खुप रिफ्रेश वाटेल.’           

Web Title: Do you want to strengthen your immune system? Then try the health drink that Malaika said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.