ठळक मुद्देदिशाने काळ्या रंगाचा टॉप आणि पँट घातली असून तिचा हा स्पोर्टी लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत प्रत्येकजण मास्क लावून घराच्या बाहेर पडत आहे. मास्कसोबत गॉगल लावल्यावर समोरच्या व्यक्तीला ओळखणे देखील कठीण जाते. नुकतेच दिशा पटानीला विमानतळावर पाहाण्यात आले. पण मास्क आणि गॉगल लावल्यामुळे तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. 

दिशाने काळ्या रंगाचा टॉप आणि पँट घातली असून तिचा हा स्पोर्टी लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. 

दिशा बॉलिवूडमधील मोजक्याच फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा आपल्या फिटनेसला घेऊन खूपच अर्लट असते. ती नेहमीच जीममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दिशा पटानी शेवटची मलंग चित्रपटात दिसली होती. आता ती 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मध्ये दिसणार आहे.यात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात सलमानच्या अपोझिट दिशा पटानी दिसणार आहे. रिपोर्टनुसार दिशा या सिनेमात जॅकी श्रॉफच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सलमान, दिशा आणि जॅकी यांनी ‘भारत’ सिनेमात काम केले. त्यानंतर आता हे तिघेही 'राधे'मध्ये एकत्र काम करत आहेत. मात्र, 'भारत' सिनेमात तिघांचा एकाही एकत्र सीन नव्हता. 'राधे'मध्ये मात्र तसे होणार नाही. 'राधे' सिनेमात दिशा जॅकीच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच दिशा लवकरच 'एक विलेन 2' मध्ये दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन 'मलंग'चा दिग्दर्शक मोहित सूरी करणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: disha patani sporty look viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.