बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. स्टुडंट ऑफ द ईअर २मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती पति पत्नी और वो चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले. आता ती खाली पीली चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटातील डेंजरस असा एक अ‍ॅक्शन सीन शूट करून तिने सेटवरील सर्वांनाच चकीत केले होते. 

खाली पीली चित्रपटाचा टीझर आणि गाणी रिलीज झाली आहेत. त्यांना प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या चित्रपटात अनन्या पांडेसोबत अभिनेता ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे अ‍ॅक्शन दिग्दर्शक परवेज शेख यांनी अनन्याचे खूप कौतूक करत सांगितले की, कशा तऱ्हेने अनन्याने बॉडी डबलचा उपयोग न करता, आपल्या अ‍ॅक्शन परफॉर्मेंसने संपूर्ण यूनिटला आश्चर्याचा धक्का दिला. 


परवेज चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले की, "जेव्हा आम्ही हा चित्रपट बनवण्याचे ठरवले तेव्हा ‘खाली पीली’ हा अ‍ॅक्शन चित्रपट नव्हता मात्र जसं जसं आम्ही शूटिंग करत गेलो, आम्ही काही अ‍ॅक्शन सीक्वेंस करण्याचे ठरवले. 


अनन्याच्या परफॉर्मेन्सबद्दल ते पुढे म्हणाले की, अनन्याचा एक विशेष अ‍ॅक्शन सीन होता, ज्याविषयी मी असा विचार केला होता की तो अनन्या करू शकणार नाही कारण हे दृश्य एक फ्री रनसोबत सुरु होते आणि त्यानंतर एका सिंगल शॉटमध्ये गुंडांवर उडी मारायची होती. छोट्याशा चूकीमुळे, खांदा तुटण्याचा किंवा मान फ्रॅक्चर होण्याची शक्यता होती. मात्र अनन्याने खरोखरच या सीनमधील तिच्या अ‍ॅक्शनने सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला ज्याची झलक आपल्याला ट्रेलरमध्ये देखील बघता येईल.

परवेझ शेख म्हणाले की, क्लायमॅक्समध्ये आणखी एक अ‍ॅक्शन सीक्वेंस आहे ज्याला एका हार्नेसच्या मदतीने करण्यात येणार होते आणि अनन्याने पुन्हा एकदा परफेक्शनसोबत अ‍ॅक्शन केली आणि संपूर्ण यूनिटने तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या कारण तो एक इंटेंस सीन होता ज्यामध्ये तिला उडी मारून गाडीवर स्वत:ला ढकलून द्यायचे होते आणि त्याचवेळी हे देखील पाहायचे होते की गाडीची काच फुटून खाली पडायला हवी आहे. साधारणपणे, बॉडी डबलचा वापर करून हा सीन करता आला असता मात्र अनन्याने ही जबाबदारी आपल्यावर घेतली आणि त्याला परफेक्शनने पूर्ण केली. अनन्या पांडे वास्तवात चांगली कलाकार आहे आणि तिने आपल्या एक्शन दृश्यांना उत्तम निभावले आहे."


अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर खाली पीली शिवाय ती सध्या दीपिका पादुकोण आणि सिद्धान्त चतुर्वेदीसोबत शकुन बत्राच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यामध्ये करत आहे आणि त्यानंतर ती विजय देवरकोंडा यांच्यासोबत 'फाइटर' नावाच्या आपल्या पैन-इंडिया प्रॉजेक्टवर काम करेल.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deadly action scene shot by Ananya Pandey in 'Khali Peeli'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.