सारा अली खान आणि वरुण धवन 'कुली नंबर 1' सिनेमाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. सिनेमाच्या व्हर्च्युअल ट्रेलर लाँचदरम्यान साराने शूटिंग दरम्यानचा मजेशीर किस्सा सांगितला होता. ती म्हणाला की, डेविड धवन यांनी एकदा वरुणचा सगळा राग माझ्यावर काढला होता.

डेविड धवन सारावर ओरडले 
 साराने सांगितले, "आम्ही लोक 'मैं तो रस्ते से जा रहा था'चे शूटिंग करत होतो. त्याचवेळी डेव्हिड सर संतापले आणि माझ्यावर ओरडले. मी शॉटसाठी तयार होते. मला कॉस्ट्यूममध्ये  काहीतरी लावायचे होतं, यात वेळ लागत होता.

वरुणमुळे शूटसाठी वेळ लागत होतो
साराने सांगितले की, वरुण व्हॅनमध्ये कॉस्ट्यूमशी रिलेटेड काम करत होता, ज्यावरुन डेविड सर त्याच्यावर खूप रागावले कारण यामुळे शूटिंगला उशीर होत होता. राग त्यांना वरुणचा आला होता मात्र तो त्यांनी माझ्यावर काढला. 

सारा आणि वरुण पहिल्यांदा एकत्र काम करतायेत. चित्रपटाची कथा गोविंदा आणि करीश्मा कपूर अभिनीत कुली नं १ पेक्षा थोडी वेगळी आहे. जिथे गोविंदा बस डेपोमधील कुली असतो तर इथे वरूण धवन रेल्वे स्टेशनचा कुली दाखवला आहे. ट्रेलरमध्ये दोघांची खूप चांगली केमिस्ट्री पहायला मिळते आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: David dhawan shouted at sara ali khan because of varun dhawan during coolie no1 shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.