Cruise rave party: आर्यनला तुरुंगातील जेवण गोड लागे ना; कॅन्टीनमधून खरेदी करतोय 'या' वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 03:55 PM2021-10-14T15:55:13+5:302021-10-14T15:56:48+5:30

Cruise rave party: अन्य कैद्यांप्रमाणे आर्यनला तुरुंगाबाहेरील पदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे अन्य कैद्यांना जे जेवणात मिळत तेच त्याला देण्यात येत आहे.

cruise rave party shahrukh khan son aryan khan will be shifts along with normal prisoners | Cruise rave party: आर्यनला तुरुंगातील जेवण गोड लागे ना; कॅन्टीनमधून खरेदी करतोय 'या' वस्तू

Cruise rave party: आर्यनला तुरुंगातील जेवण गोड लागे ना; कॅन्टीनमधून खरेदी करतोय 'या' वस्तू

Next
ठळक मुद्देआर्थर रोड तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आर्यनला अन्य कैद्याप्रमाणेच तुरुंगातील जेवण देण्यात येतं.

Cruise drugs case: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh khan) लेक आर्यन खानला (aryan khan)  ड्रग्स पार्टीप्रकरणी (drugs party) अटक करण्यात आली आहे. सध्या आर्यन आर्थर रोड तुरुंगात असून त्याला सर्व सामान्य कैद्यांप्रमाणे रहावं लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्यन आर्थर रोड तुरुंगात क्वारंटाइन बराकमध्ये रहात होता. मात्र, आता त्याचा क्वारंटाइन कालावधी संपल्यामुळे त्याला अन्य कैद्यांसोबत रहावं लागणार आहे.यामध्येच आर्यन सध्या तुरुंगात कशा पद्धतीने रहात आहे याकडे अनेकांचं लक्ष आहे. त्यातच आर्यन या तुरुंगातील कॅण्टीनमधून नेमके कोणते पदार्थ खरेदी करतो हे समोर आलं आहे.
आर्यनला खावं लागतंय तुरुंगातील जेवण

आर्थर रोड तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आर्यनला अन्य कैद्याप्रमाणेच तुरुंगातील जेवण देण्यात येतं. यामध्ये वरणभात, भाजी-पोळी यांचा समावेश असतो. अन्य कैद्यांप्रमाणे आर्यनला तुरुंगाबाहेरील पदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे अन्य कैद्यांना जे जेवणात मिळत तेच त्याला देण्यात येत आहे. आर्यनला बाहेरील पदार्थ खाण्यास मनाई असली तरीदेखील त्याला घरातील कपडे परिधान करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आर्यन सध्या घरातून पाठवलेले कपडेच घालत आहे.

आर्यनने तुरुंगातील कॅण्टीनमधून खरेदी केल्या या वस्तू

सूत्रांच्या माहितीनुसार, आर्यन तुरुंगात जेवण देण्यात येत असलं तरीदेखील तो येथील कॅण्टीनमधून काही पदार्थ खरेदी करतो. यात शक्यतो तो पाण्याची बाटली, बिस्कीटचे पुडे आणि स्नॅक्सची काही पाकिट खरेदी करत असल्याचं सांगण्यात येतं. 

आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट या दोघांनाही आर्थर रोड जेलच्या बॅरेक क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आलं आहे.  या दोघांचीही RT-PCR  चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना स्पेशल क्वारंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. आर्यनला ठेवण्यात आलेल्या बॅरेक क्रमांक १मध्ये आलं आहे. मात्र, लवकरच त्याला अन्य कैद्यासोबत शिफ्ट करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 
 

Web Title: cruise rave party shahrukh khan son aryan khan will be shifts along with normal prisoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app